Pay Parking Dainik Gomantak
गोवा

Pay Parking Issue: कोलवा किनाऱ्यावर पार्किंग शुल्क आकारण्यास विरोध

Pay Parking Issue: आदेश मागे घ्या : खास ग्रामसभा बोलावणार

दैनिक गोमन्तक

Pay Parking Issue: कोलवा किनाऱ्यावर वाहन पार्किंगसाठी पर्यटन खात्याने शुल्क आकारण्याचे ठरविले असून कोलवा आणि बाणावली येथील नागरिकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. कोलवा समुद्रकिनारी दुचाकी, चारचाकी, कार आणि मोटारसायकल पायलट दुचाकींसाठी ‘पे पार्किंग’ सुरू करण्याचा पर्यटन खात्याने निर्णय घेतला असून तशी अधिसूचना काढण्यात आली आहे.

मात्र, ती मागे घ्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली. यावर निर्णय घेण्यासाठी स्थानिक पंचायतीने खास ग्रामसभा बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलवा समुद्र किनाऱ्याला ‘आयकॉनिक बीच’चा दर्जा देण्यात आला असून या किनाऱ्यावर अनेक पर्यटक येत असतात.

स्थानिक लोक आणि व्यावसायिकांनी शॅकमालक आणि वॉटर स्पोर्ट्समध्ये गुंतलेल्या स्थानिक व्यवसायांवर ‘पे पार्किंग’चा होणारा संभाव्य नकारात्मक परिणाम तसेच प्रतिष्ठित कोलवा बीचला भेट देणारे पर्यटक आणि स्थानिक दोघांची गैरसोय यावर आज त्यांनी प्रकाश टाकला.

हा निर्णय घेण्यापूर्वी पर्यटन खात्याने स्थानिकांना विश्वासात घेण्याची गरज होती. पर्यटन खात्याला महसूल हवा म्हणून त्यांनी स्थानिकांना वेठीस धरणे योग्य नव्हे.
- व्हेंझी व्हिएगस, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT