Opposition to discharging sewage into the Sal River Dainik Gomantak
गोवा

साळ नदीत सांडपाणी सोडण्यास विरोध; बाणावली ग्रामसभेत ठराव

पश्‍चिम बगल रस्ता हा चर्चेचा मुख्य विषय

दैनिक गोमन्तक

सासष्टी: बाणावली ग्रामसभेत अनेक प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली व त्यासंदर्भात अनेक ठराव मंजूर करण्यात आले. पश्‍चिम बगल रस्ता हा चर्चेचा मुख्य विषय होता. प्रक्रिया केलेले सांडपाणी साळ नदीमध्ये सोडण्यास विरोध, हा दुसरा मुद्दा होता.

गुरुवारी झालेल्या या सभेस सरपंच व उपसरपंच मिळून 11 पंचसदस्य तसेच पंचायत सचिव, आमदार वेन्झी व्हिएगस व जिल्हा परिषद सदस्य हेन्झेल फर्नांडिस उपस्थित होते.

बाणावलीतून जाणारा पश्र्चिम बगल रस्ता स्टिल्टवर बांधण्याचा आग्रह सर्वांनीच या बैठकीत धरला. यासंदर्भात जलतज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यासाठी पंचसदस्य व स्थानिकांची मिळून एक खास समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय प्रत्येक वेळी ज्याज्या घडामोडी होतात, त्याची माहिती लोकापर्यंत पोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पश्‍चिम बगल रस्ता स्टिल्टवर बांधण्यासाठी जो जादा निधी लागणार आहे, त्यासंदर्भात पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची विनंती करण्याचे ठरले. राष्ट्रीय हरित लवादाकडे अर्ज केलेल्या अर्जदार रॉयला फर्नांडिस यांनी अर्जातील माहिती ग्रामसभेत प्रस्तुत केली. बाणावलीच्या विकासासाठी होणाऱ्या निर्णयास पाठिंबा असेल , असे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT