Goa comunidade land bill | Illegal houses legalization Goa Dainik Gomantak
गोवा

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

Goa comunidade land bill: पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने 'दी गोवा डिप्लोमा (दुरुस्ती) २०२५' विधेयक बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याचे विधेयक संमत झाले आहे. त्याला विविध कोमुनिदाद संघटनांनी विरोध केला आहे. राज्यातील सर्व कोमुनिदादींनी या विधेयकाला विरोध दर्शविणारा ठराव मांडून येत्या २४ ऑगस्टला पर्वरीत होणाऱ्या खास बैठकीवेळी तो सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

येथील कोमुनिदादच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी (१४ ऑगस्ट) बैठक पार पडली. यावेळी राज्यातील १४ कोमुनिदादींचे अ‍ॅटर्नी व व्यवस्थापनातील सदस्य, तसेच आमदार व्हेन्झी व्हिएगस यांची उपस्थिती होती. पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने 'दी गोवा डिप्लोमा (दुरुस्ती) २०२५' विधेयक बहुमताच्या जोरावर मंजूर केले असले तरी त्याला सर्व कोमुनिदादींचा विरोध आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

राज्यातील सर्व कोमुनिदादनी उर्वरित राहिलेल्या दिवसांत बैठक घ्यावी आणि विरोध असल्याचा ठरावाचा कागद पर्वरीतील कार्यक्रमात सादर करावा. सेंट झेव्हियर संशोधन केंद्रात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

पैसे भरू नका, फसाल!

येत्या २४ ऑगस्टपूर्वी आम्ही राज्यपालांना भेटून याविषयी माहिती देणार आहोत. ज्याप्रमाणे यापूर्वी भूमिपूत्र विधेयक आणले होते तसेच भूमिपूत्र-२ अस्तित्वात आणले गेले आहे. कोमुनिदादच्या ३०० मीटर जागा देण्याचे जे सरकारने म्हटले आहे, त्यांनी अजिबात सरकारकडे पैसे भरू नयेत.

पैसे भरल्यास ते परत मिळणार नाहीत. १६-बी प्रमाणे ज्यांनी जमीन व्यवहार केला, त्यात जसे लोक अडकले आहेत, तसे होईल असेही याप्रसंगी उपस्थित आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी संगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

SCROLL FOR NEXT