Konkan Railway Konkan Railway Official Account
गोवा

Konkan Railway: गोव्यात होणाऱ्या 3 नव्या रेल्वे स्थानकांना विरोध; हिवाळी अधिवेशनात आमदारांचा विरोधी सूर

Goa MLA Oppose Three New Railway Stations: गोव्यात नव्याने होणाऱ्या तीन रेल्वे स्थानकांना काही आमदारांनी विरोध दर्शवला आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात नव्याने तीन रेल्वे स्थानक होणार आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावर होणाऱ्या या नव्या स्थानकांमुळे प्रवाशांना फायदा होणार असला तरी आता या स्थानकांना राज्यातून विरोध होत आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी बाकावरील आमदारांनी नव्या स्थानकांना विरोध दर्शवला. स्थानिकांचा विरोध होत असताना नवी स्थानके कशासाठी असा सवाल आमदारांनी उपस्थित केला.

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी गोव्यात नेवरा, सारझोरा आणि मये या ठिकाणी तीन नवीन रेल्वे स्थानक जाहीर करण्यात आली आहेत. नव्या रेल्वे स्थानकांना सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी बाकावरील आमदारांनी विरोध दर्शवला.

आपचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी याबाबत लक्षवेधी मांडली. स्थानिकांचा विरोध होत असताना नव्याने स्थानक उभारण्याचा घाट का घातला जात आहे, असा सवाल सिल्वा यांनी उपस्थित केला.

तसेच, जे हवं ते देण्याऐवजी नको ते का माथी मारले जात आहे, असेही सिल्वा म्हणाले. शिवाय कोळसा वाहतूक आणि इतर प्रदूषण संबधित वस्तूंच्या वाहतुकीची शंका त्यांनी उपस्थित केली. सिल्वा यांच्या लक्षवेधीवर आमदार वीरेश बोरकर, वेंझी व्हिएगस यांनी देखील मत मांडले.

वीरेश बोरकर यांनी नेवरा येथील रेल्वे स्थानकाला ३० वर्षापूर्वी देखील विरोध झाला होता. खाजन शेतकऱ्यांच्या विरोधानंतर हे रेल्वे स्थानक करमळी येथे हलविण्यात आले होते. दरम्यान, पुन्हा एकदा येथे येथे स्थानक का आणले जातंय, असे बोरकर म्हणाले.

आपचे आमदार वेँझी व्हिएगस यांनी देखील नव्या स्थानकांना विरोध दर्शवला. नव्याने होणाऱ्या तीन रेल्वे स्थानकाला स्थानिक नागरिक आणि आमदार विरोध करत आहेत, असे राज्य सरकारने केंद्राला कळवावे अशी विनंती व्हिएगस यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री सावंत यांनी यावर उत्तर देताना रेल्वेचा विषय केंद्राच्या अखत्यारित येतो असे सांगत विषय गुंडाळण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, यावेळी त्यांनी कोकण रेल्वेच्या मार्गे गोव्यात कोळसा वाहतूक होणार नाही हे स्पष्ट केले. शिवाय ज्यांना त्यांच्या मतदारसंघात रेल्वे स्थानक नको आहेत त्यांनी लेखी द्यावे, असेही सावंत म्हणाले.

नव्या स्थानकांना विरोध व्हायला लागल्यानंतर वाहतूक मंत्री माविन यांनी आक्षेप घेत काय प्रश्न उपस्थित करतो यावर आमदारांनी विचार करावा, असे म्हटले. यावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT