Nilesh Cabral News Dainik Gomantak
गोवा

विरोधकांकडून लोकांची दिशाभूल: निलेश काब्राल

शेल्डे, असोल्डा तळ्यांच्या सुभिकरणाचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

केपे: आपल्या कार्यकाळात कुडचडेचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न केले. पण काही विरोधक काही विकासकामांबाबत कोणताही अभ्यास न करता लोकांची दिशाभूल करीत आहे अशी टीका सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी केली. ते शेल्डे व असोल्डा येथील तळ्यांच्या सुशोभिकरणाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात बोलत होते. (Nilesh Cabral News)

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई, सरपंच कायतान लिमा, पंच सदस्य प्रमोद देसाई, विवेक शेटकर, नगराध्यक्ष विश्वास सावंत देसाई व इतर मान्यवर हजर होते. ‘२५ लाख खर्चून जिल्हा पंचायत निधीतून दोन्ही तळींचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. कुडचडे मतदारसंघात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. तर काही पूर्णत्वास गेली आहे. काकोडा येथील अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात असून त्याचे ३० मे रोजी उद्‍घाटन होऊ शकते. तसेच मल निस्सारण प्रक्रिया प्रकल्प, भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम प्रगतीपथावर आहे’ असे काब्राल यांनी सांगितले. तर काब्राल यांच्या सहकार्यामुळे कुडचडे पालिका क्षेत्राबरोबर पंचायत क्षेत्रातील भागांचाही विकास होत असल्याचे सिद्धार्थ गावस देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT