Illegal Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Extraction: होड्या तोडण्याच्या कारवाईला विरोध

Illegal Sand Extraction: न्हयबाग-पोरस्कडे येथे स्थानिक आक्रमक : उर्वरित होड्यांवर आज होणार कारवाई

दैनिक गोमन्तक

Illegal Sand Extraction: बेकायदा रेती उत्खनन केल्याप्रकरणी खाण खात्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त केलेल्या होड्या तोडण्याची कारवाई आज सुरू केली. न्हयबाग-पोरस्कडे येथील एक होडी आज तोडण्यात आली. मात्र, स्थानिकांनी विरोध केल्यामुळे ही मोहीम थांबवण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, 2020 साली बेकायदा रेती उपसा केल्याप्रकरणी एकूण 26 होड्या जप्त केल्या होत्या. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या होड्यांवर कारवाई

करण्यासाठी आज खाण खात्याचे अधिकारी आले असता स्थानिकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे उर्वरित होड्यांवर कारवाई करताना अडथळा निर्माण झाल्याने पेडणे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी पेडणे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विवेक हळदणकर आणि इतर पोलिस कर्मचारी आल्यावर खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी तेथे घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. उद्या (बुधवारी) पोलिसांच्या उपस्थितीत उर्वरित 25 होड्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी खाण खात्याचे अधिकारी विनय शिरोडकर म्हणाले की, यापुढे एखादी होडी पाण्यात रेती उपसा करताना दिसली तर त्यावर स्थानिक पोलिस कारवाई करणार असून आम्ही त्या होड्यावर तोडणार आहोत. तसा आम्हाला आदेशच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT