Mopa Airport taxi news Dainik Gomantak
गोवा

Mopa Taxi Services: मोपा विमानतळावरील 'ब्ल्यू कॅब सेवा' अचानक बंद; आमदार आरोलकर पुन्हा बनणार का टॅक्सी चालकांचे तारणहार?

Blue Cab taxi services Goa: पेडणे तालुक्यातील टॅक्सी चालकांसाठी सुरू करण्यात आलेली 'ब्लू कॅब' प्रीपेड टॅक्सी सेवा सुरक्षा मंजुरी न मिळाल्याचे कारण देत बंद करण्यात आली

Akshata Chhatre

Blue Cab service suspended: पेडणे तालुक्यातील टॅक्सी चालकांसाठी खास सुरू करण्यात आलेली 'ब्लू कॅब' प्रीपेड टॅक्सी सेवा मोपा विमानतळावर मंगळवारपासून (दि. १५) अचानक बंद करण्यात आली आहे. विमानतळ प्रशासनाने सुरक्षा मंजुरी न मिळाल्याचे कारण देत ही कारवाई केली असल्याने स्थानिक टॅक्सी चालकांमध्ये नाराजी पसरलीये.

जीएमआर एअरपोर्ट्स लिमिटेडने ब्लू कॅब प्रीपेड टॅक्सी असोसिएशनला पाठवलेल्या पत्रानुसार, परवाना करारातील नियमांनुसार असोसिएशनला गृह मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोची सुरक्षा मंजुरी घेणे आवश्यक होते.

वारंवार याबद्दल माहिती देऊन देखील ही मंजुरी सादर न केल्याने परवाना कराराचे उल्लंघन झाले असल्याचे नमूद करत जीएएलने तातडीने सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वीही जून २०२४ आणि जानेवारी २०२५ मध्ये यासंदर्भात नोटिसा पाठवल्याचा दावा जीएएलने केलाय. ब्लू कॅब प्रीपेड टॅक्सी असोसिएशनने नोटीस मिळाल्याची माहिती देत याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.

मोपा विमानतळावरील गोवा पर्यटन विकास महामंडळाचा टॅक्सी काउंटर १ एप्रिलपासून बंद होता, जो मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या मध्यस्थीनंतर नुकताच पुन्हा सुरू झालाय. मात्र आता ब्लू कॅब सेवा बंद झाल्याने पेडणेतील अनेक टॅक्सी चालकांच्या रोजगारावर पुन्हा एकदा संकट ओढवले आहे.

विमानतळ सुरू झाल्यापासून स्थानिक टॅक्सी चालक स्वतंत्र काउंटरसाठी आंदोलन करत होते आणि अनेक प्रयत्नांनंतर त्यांना ही ब्लू कॅब सेवा मिळाली होती, मात्र आता तीही बंद झाल्याने त्यांच्यात असंतोष पसरलाय. गेल्यावेळीप्रमाणे आमदार आरोलकर पुन्हा मध्यस्थी करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Butterflies In Goa: 'ताकदवान क्रूजर युद्धनौकांवरुन नाव दिलेले, गोव्यात सर्वत्र आढळणारे फुलपाखरु'; फुलपाखरांतील राजेशाही

Goa Temples: ‘कोकणाख्याना’त गोव्याचे निर्माण परशुरामाने बाण मारून केल्याचा उल्लेख होतो; धर्मस्थानांच्या दंतकथा

Goa Live News: 'पक्षांतर केलेल्यांचे समर्थन आम्हाला नको!' सरदेसाईंच्या वक्तव्यावर विरेश बोरकर यांचे सडेतोड उत्तर

iFFI 2025: 'कोमात असताना स्वप्नात खोल समुद्र, घनदाट जंगल दिसायचे', पेस्कॅडोर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सांगितली निर्मितीमागची रंजक कथा

Goa Revenue: स्‍टँप ड्युटीतून मिळणाऱ्या महसुलात घट! अहवालातील आकडेवारीतून उघड; GST वरील करांत मात्र वर्षभरात वाढ

SCROLL FOR NEXT