Ramesh Tawadkar, Ravindra Bhavan Canacona Dainik Gomantak
गोवा

Ravindra Bhavan Canacona: काणकोण रवींद्र भवनाचे होणार २७ रोजी उद्‍घाटन! जोरदार तयारी सुरू

Ramesh Tawadkar: बारा वर्षांपूर्वी रमेश तवडकर व तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण रवींद्र भवनाचे उद्‍घाटन २७ जुलैला करण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. नुकतीच सभापती रमेश तवडकर यांनी तयारीची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.रवींद्र प्रकल्पाची पायाभरणी होऊन एक तप पूर्ण झाले आहे. बारा वर्षांपूर्वी रमेश तवडकर व तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती.

सुमारे ६५ कोटींचा हा प्रकल्प कला व संस्कृती खात्याच्या अंतर्गत हा प्रकल्प साधन‌ सुविधा मंडळ पूर्ण करीत आहे. साधन सुविधा महामंडळ कोणताही प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय त्या प्रकल्पाचे हस्तांतरण करीत नाही, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. मंत्री गोविंद गावडे यांनी यंदाची राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा काणकोण रवींद्र भवनात घेण्याची घोषणा केली होती.

त्याचबरोबर यंदाच्या राज्यस्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन १७ ऑगस्टला रवींद्र भवनात करण्याचे सभापती रमेश तवडकर यांनी निश्चित केले आहे.या सर्व उपक्रमांसंदर्भात सभापतींनी आज रवींद्र भवनाची पाहणी करून कामाच्या विकासाचा आढावा घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT