cemetery
cemetery 
गोवा

गोव्यात अंत्यसंस्कार ‘एनओसी’साठी मोजावे लागतील फक्त 100 रु.

दैनिक गोमंतक

पणजी: कोविड - 19 (Covid - 19) च्या पार्श्‍वभूमीवर सांतिनेझ हिंदू स्मशानभूमीत (cemetery) मृतदेहाच्या अंतसंस्कारासाठी पणजी महापालिकेने एक हजार रुपयांमध्ये सवलत देत फक्त100 रुपये शुल्क ‘ना हरकत दाखल्या’साठी (NOC) आकारले जाणार आहे व पणजी महापालिका क्षेत्रातील रहिवाशांसाठी मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी मोफत शववाहिका उपलब्ध केली जाईल, असा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासंदर्भातचे पत्रक  महापौर रोहित मोन्सेरात (Rohit Monsera) यांनी काढले आहे.  (Only Rs 100 will be charged for the funeral NOC)

कोविडग्रस्त मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळातून सांतिनेझ स्मशानभूमीत शववाहिकेने आणण्यासाठी ५०० रुपये आकारले जातील. मात्र, पणजी क्षेत्रातून स्मशानभूमीत नेण्यासाठी पैसे आकारले जाणार नाहीत. कोरोना संकटामुळे लोक अगोदरच अडचणीत आहेत. त्यामुळे ना हरकत दाखल्यासाठी पणजी महापालिकेच्या क्षेत्राबाहेरील मृतदेहाच्या अंत्य-संस्कारासाठी अतिरिक्त एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार नाहीत. दुपारी 2 ते संध्याकाळी7 वाजेपर्यंतच कोविडग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आल्‍याचे महापालिकेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.  

सांतिनेझ स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यासाठी लागणाऱ्या लाकडासाठी 2800 रुपये आकारले जातील व ही रक्कम हिंदू स्मशानभूमी व्यवस्थापकीय समितीकडे जमा करावी. या रक्कमेव्यतिरिक्त स्मशानभूमीत कोणालाही आणखी पैसे देऊ नयेत. या स्मशानभूमीत आणलेला कोविडग्रस्त मृतदेह पणजी महापालिका कर्मचारी हाताळणार नाहीत. ना हरकत दाखल्यासाठी अर्ज करताना मृतदेहाच्या नातेवाईकांनी डॉक्टरने दिलेला मृत्यूचा दाखला, आधार कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र सादर करणे आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी महापौरांचे विशेष अधिकारी जॉन फर्नांडिस (मोबाईल क्र. 9822125599) यांच्याशी संपर्क साधावा असे काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT