Goa Money Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दुप्पट पैशांचे आमिष अंगलट आले, 16 वर्षीय तरुणाची फसवणूक; अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Goa Money Scam: वरगाव-माशेल येथे राहणाऱ्या आरती देवी या महिलेची ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: वरगाव-माशेल येथे राहणाऱ्या आरती देवी या महिलेची ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरती देवी यांच्या सोळा वर्षीय मुलाला समाज माध्यमांवर “गुंतवणूक करा आणि दुप्पट पैसे मिळवा” अशी आकर्षक जाहिरात दिसली. त्याने जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने सुरुवातीला तीन हजार रुपये गुंतवण्यास सांगितले.

यानंतर भामट्याने मोठा नफा मिळवण्यासाठी एक लाख रुपये गुंतवण्याचा सल्ला दिला. “२ लाख १५ हजार रुपये परत मिळतील” असे आमिष दाखवत विविध कर, प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्कांच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने पैसे भरायला लावले. मात्र, पैसे भरल्यानंतर संबंधित व्यक्तीने संपर्क तोडला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरती देवी यांनी म्हार्दोळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. नागरिकांनी अशा ऑनलाईन गुंतवणूक योजनांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

SCROLL FOR NEXT