Patradevi To Bambolim Traffic Update Dainik Gomantak
गोवा

वाहनचालकांना दिलासा! NH-66 वरील पत्रादेवी ते बांबोळी सर्व्हिस रोडवर एकेरी वाहतूक सुरु, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

Patradevi To Bambolim Traffic Update: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 (NH-66) वरील पत्रादेवी ते बांबोळी (गोवा मेडिकल कॉलेज) या दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर आता एकमार्गी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

Manish Jadhav

One-Way Traffic Starts On NH-66 Service Road From Patradevi To Bambolim

पणजी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 (NH-66) वरील पत्रादेवी ते बांबोळी (गोवा मेडिकल कॉलेज) या दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर आता एकमार्गी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. गोवा सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) यासंबंधी अधिसूचना जारी करुन माहिती दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, NH-66च्या मुख्य मार्गावरील वाहतुकीच्या (Transportation) दिशेनुसार संबंधित सर्व्हिस रोडवर देखील एकमार्गी वाहतूक सुरु करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण अधिनियम, 2002 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था

कार्यकारी अभियंता ज्युड ए. डी. कार्व्हालो यांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रादेवी ते झुआरी पुलापर्यंतच्या NH-66 च्या प्रशासनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पत्रादेवी ते बांबोळी या दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर मुख्य मार्गावरील वाहतुकीच्या दिशेनुसार एकमार्गी वाहतूक सुरु करण्यात आली. ही वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने करण्यात आली असून, संबंधित वाहनचालकांनी या नव्या व्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral video: चालत्या कारच्या छतावर चढले अन्… तरुणांचा धोकादायक स्टंट व्हायरल; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

BCCI Election: बीबीसीआयच्या निवडणुकीत गोवा क्रिकेट असोसिएशनचा मतदार असणार का? शनिवारी होणार निर्णय

गोव्यात असणाऱ्या परराज्यांतील कंपन्यांनी येथेच मुलाखती घेऊन स्थानिकांना रोजगारास प्राधान्य द्यावे; CM सावंतांचे यार्वीच निर्देश

Goa Rain: गोव्यात पावसाची दमदार वापसी! विजांचा कडकडाट, पुढील तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

England T20 World Record: अशक्य ते शक्य! इंग्रजांनी टी-20 मध्ये केल्या 300 धावा; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वविक्रमाची नोंद, पाहा Highlights

SCROLL FOR NEXT