Lokotsav 2024
Lokotsav 2024 Dainik Gomantak
गोवा

Lokotsav 2024: लोकोत्सवातील एका स्टॉलधारकाचा दुर्दैवी अंत! हृदयविकाराचा झटक्याने जागीच गतप्राण...

Kavya Powar

Lokotsav News 2024: सध्या पणजीमध्ये गोव्याची लोककला आणि संस्कृती जपणारा लोकोत्सव सुरू आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (बुधवार) पहाटे लोकोत्सवातील एका स्टॉलधारकाचा मृत्यू झाला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मोहम्मद फिरोज असे स्टॉलधारकाचे नाव असून तो मूळचा उज्जैन, मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे. त्याने लोकोत्सवातील एक स्टॉल मिळवला होता. कुटुंबासोबतच तो ही या स्टॉलवर असायचा.

आज सकाळी त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच गतप्राण झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून सदर मृतदेह शवचिकीत्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे.

दरम्यान, शवचिकीत्सेनंतर मोहम्मद यांचा मृतदेह विमानाने अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मुळगावी मध्यप्रदेशात पाठवण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT