Lok Sabha Election 2024 Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: पहिला टप्पा गृहीत धरून प्रचाराची एक फेरी पूर्ण

Lok Sabha Election: तानावडे: सध्या ‘कमळ’ चिन्हावरच प्रचार

दैनिक गोमन्तक

Lok Sabha Election:

लोकसभा निवडणुकीत गोव्याचा समावेश मतदानासाठी तिसऱ्या टप्प्यात करण्यात आल्याने आम्हाला प्रचारासाठी आणखीन वेळ मिळणार आहे. गोव्यात पहिल्याच टप्प्यात मतदान होईल असे गृहीत धरून आम्ही प्रचाराची एक फेरी आधीच पूर्ण केली होती, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज सांगितले.

ते म्हणाले, उमेदवार जाहीर होण्याआधीच आम्ही ‘कमळ’ ही निशाणीच आज आमचा उमेदवार असे सांगत प्रचार सुरू केला आहे. उत्तर गोव्यातून विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी आपल्या प्रचाराला गती दिली आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार उद्या किंवा परवा जाहीर होऊ शकतो.

दोन्ही मतदारसंघातील प्रचार कार्यालये आम्ही यापूर्वीच सुरू केली आहेत. त्याशिवाय प्रचार प्रमुखांचीही नियुक्ती केली आहे. मतदान केंद्र तसेच मंडळ पातळीवरील समित्यांच्या सदस्यांनी जनतेच्या गाठीभेटी घेणे याआधीच सुरू केले असून त्यांनी अशा भेटींचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. पहिल्या टप्प्यातच गोव्यात मतदान होईल असे गृहीत धरून आमची ही तयारी होती. आता आम्हाला प्रचारासाठी वाढीव कालावधी मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT