Dodamarag Police Station|Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Dodamarg Police Outpost: तपासणी नाके एकाच छताखाली आणणार! दोडामार्ग पोलिस चौकी लोकार्पणावेळी मुख्यमंत्र्यांची माहिती

Police Outpost At Dodamarg: राज्यातील सीमारेषेवरील नाके एकाच छताखाली आणून सीमेवरील (बॉर्डर) वरील सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यावर सरकारचा विचार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: राज्यातील सीमारेषेवरील तपासणी नाके एकाच छताखाली आणून सीमेवरील (बॉर्डर) वरील सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यावर सरकारचा विचार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

नवा साज देण्यात आलेल्या दोडामार्ग पोलिस चौकी इमारतीचे आज (रविवारी ) लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे 50 लाख रुपये खर्च करुन पोलिस चौकी इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकारी जमिनींवर अतिक्रमण खपवून घेण्यात येणार नाही.

त्याविरोधात कारवाई करण्यात येईल. असा पुनःरूच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला. या सोहळ्यास डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह पोलिस महासंचालक अलोक कुमार, आयजीपी राहूल गुप्ता, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर आदी उपस्थित होते. श्याम शिरोडकर यांनी स्वागत केले. प्रदीप रेवोडकर यांनी आभार मानले.

तपासणी सुलभ होणार

एका छताखाली तपासणी नाक्याचा प्रस्ताव मार्गी लागल्यानंतर सीमारेषेवरील तपासणी सुलभ होणार आहे. पत्रादेवी सीमेपासून ही योजना सुरु करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: HRA मध्ये अपेक्षेपेक्षा मोठी वाढ होण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक, पाहा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT