Ponda News Dainik Gomantak
गोवा

Ponda News : दुसऱ्या मजल्यावरून तो उडी मारणारच होता, पोलिसांनी लढवली ही शक्कल अन्...

फोंड्यातील प्रकार; घटना पाहण्यासाठी बघ्यांनी प्रचंड गर्दी

Rajat Sawant

फोंड्यात एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याच्या बेतात असलेल्या एका मनोरुग्णाला जीवनदान देण्यात पोलिसांना यश आले आहे. ही घटना आज घडली. फोंडा पोलिसांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फोंड्यातील वरचा बाजार भागात असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एक मनोरुग्ण उडी मारण्याच्या बेतात असल्याची माहिती फोंडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीमध्ये मनोरुग्ण कठड्याच्या बाहेर एक पाय घालून उभा होता. यावेळी फोंडा पोलिस स्थानकाशी संबंधित बिंदेश म्हार्दोळकर व अब्दुल सत्तार आगा या दोघांनीही त्याला बोलण्यात गुंतवले. बोलण्यात गुंतवून मनोरुग्णाचा लक्ष नसताना पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला कठड्यापासून दूर केले.

यानंतर मनोरुग्णाची रवानगी रुग्णालयात करण्यात आली. हा मनोरुग्ण बिगर गोमंतकीय असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या थरारक घटनेची दृष्ये कॅमेरॅत कैद करण्यात आली आहेत. तसेच ही घटना पाहण्यासाठी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान फोंडा पोलिसांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोर्तुगीजकालीन कागदपत्रे आता एका क्लिकवर! 'गोवा ऑनलाईन' पोर्टलवर सुरु होणार सर्वात मोठी डिजिटल सेवा; नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार

खरी कुजबुज: युती तुटणार? की वाद मिटणार?

Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

CM Janjatiya Maje Ghar Yojana: आदिवासी बांधवांसाठी खूशखबर! ‘मुख्यमंत्री जनजातीय माझे घर’ योजना सुरु; आता तुमचे घर होणार हक्काचे आणि कायदेशीर

SCROLL FOR NEXT