Goa Murder Case |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: गोव्यात आणखी एक खून, तेरेखोल नदीत आढळला झारखंडच्या कामगाराचा मृतदेह

Goa Murder Case: पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासणी केली असता खूनाचा संशय व्यक्त केला. अखेर खूनाचा गुन्हा नोंद केला आहे.

Pramod Yadav

Goa Murder Case

गोव्यातून आणखी एक खूनाची घटना समोर आली आहे. पेडण्यातील तेरेखोल नदीत शनिवारी (दि.२०) सकाळी झारखंडच्या कामगाराचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासणी केली असता खूनाचा संशय व्यक्त केला. अखेर सायंकाळी याप्रकरणी पेडणे पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद केला आहे.

पिळर्ण-पर्वरीत रेहबर खान या उत्तरप्रदेशातील युवकाचा खून झाल्याची घटना ताजी असताना आणखी एक खूनाची घटना समोर आली आहे. सलूनमध्ये काम करणाऱ्या रेहबर खानचा खून करुन त्याचा मृतदेह पर्वरीतील ऑडिट भवन येथे फेकून देण्यात आला होता.

याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित विकास यादव याच्यासह आणखी सहा जणांना अटक केलीय. सर्व संशयितांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रेहबर खानचा ट्रव्ह ट्रँगल प्रकरणातून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, तेरेखोल नदीत झारखंडच्या कामगाराचा मृतदेह आढळल्याने त्याचा देखील खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

वाडे-दाबोळीतील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरण

वाडे-दाबोळी येथे पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात दोन आरोपींना बलात्‍कार आणि खुनाच्या आरोपाखाली अटक केली होती, त्‍यांची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत करण्‍यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Unemployment In Goa: गोव्यात PhD धारकच बेरोजगार! बेकारांमध्ये बारावी झालेले आघाडीवर; पदवीधर दुसऱ्या स्‍थानी

Goa Cluster University: स्थानिक महाविद्यालयांना संरक्षण कसे मिळणार? क्लस्टर विद्यापीठ विधेयकावरुन सरदेसाईंचा सवाल

Isolated Tribe India: खून केला तरी माफ, भारतातले 'गूढ' बेट आणि हजारो वर्षांपूर्वी स्थलांतरित झालेले संरक्षित आदिवासी

Goa CAG Report: कॅगचे रिपोर्ट कार्ड! अतिरिक्त निधी, वाढत्या थकबाकीवरून ओढले ताशेरे; कर्ज पोचले 32867 कोटींवर

August Kranti Day: 'करो या मरो'! 9 ऑगस्ट बनला स्वातंत्र्य लढ्याचा टर्निंग पॉइंट; 'ऑगस्ट क्रांती'च्या वादळाने उखडली ब्रिटिश सत्तेची पाळेमुळे

SCROLL FOR NEXT