kajareghat Waterfalls  Dainik Gomantak
गोवा

Goa Waterfall : 'काजरेघाट' दुर्घटनेतील दुसरा मृतदेह सापडला

सत्तरी तालुक्यातील सावर्डे पंचायत क्षेत्रातील काजरेघाट याठिकाणी सोमवारी वास्को येथील दोन तरुण बुडाले होते.

दैनिक गोमन्तक

वाळपई : सत्तरी तालुक्यातील सावर्डे पंचायत क्षेत्रातील काजरेघाट या ठिकाणी सोमवारी वास्को येथील दोन तरुण बुडाले होते. यापैकी शशी सोमनाळ या एकाचा तरुणाचा मृतदेह सोमवारी सापडला होता. मात्र गौरव सिंग यांचा मृतदेह अनेक स्तरावर शोधाशोध करून सुद्धा सापडला नव्हता. काल बुधवारी तिसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या तरुणाचाही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

काजरेघाट धबधबा परिसर हा धोकादायक असून सदर ठिकाणी पर्यटकांना बंदी घालावी, अशा प्रकारची मागणी स्थानिकांनी केली आहे. यासंदर्भात पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा प्रकारची मागणी केली आहे. आमदार तथा मंत्री विश्वजीत राणे यांनी सुद्धा या धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालावी, अशा प्रकारची मागणी केली आहे.

वास्कोतील आठ जण सहलीसाठी कोणीर धबधब्यावर येथे आले. अती पावसामुळे येथील पाण्याचा प्रवाह जोरात सुरू आहे. यावेळी शशी आणि गौरव हे दोघे सेल्फी फोटो काढत होते. या दरम्यान एकाचा पाय घसरला त्याला हात देत असताना दुसराही वाहुन गेला.

साेशल मीडियावर पाहून वास्कोतील तरुणांनी या धबधब्याची सहलीसाठी निवड केली होती. धाेकादायक ठिकाणी जाऊन सोशल मीडियावर फोटो टाकण्याच्या मोहापायी दोघांनी आपला जीव गमावला. शशी साेमनल हा एमएएस काॅलेजमध्ये तेरावीच्या वर्गात शिकत होता. तर गाैरव हा त्याच काॅलेजमध्ये अकरावीचे शिक्षण घेत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT