Robbery in Train Dainik Gomantak
गोवा

रेल्वे प्रवासात महिलेची लूट; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

कोकण रेल्वे पोलिसांकडून संशयिताला बेड्या; रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

दैनिक गोमन्तक

मडगाव : रेल्वेमधून प्रवास करत असताना एका महिलेची लूट करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे मिळून एकंदरीत 5.20 लाख ऐवज असलेले बॅग लंपास करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार कोकण रेल्वे पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.

(One Held by Konkan Railway Police for Robbery in Train)

संबंधित महिला कोईम्बतूर एक्स्प्रेस मधून प्रवास करत होती. दुपारच्या वेळी 3.30 वाजता सोन्याच्या रिंग, सोनसाखळी, रोख रकमेसहित इतर मौल्यवान वस्तू असलेली तिची बॅग चोरण्यात आल्याची असल्याची माहिती पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आली आहे . या वस्तूंची एकंदरीत किंमत अंदाजे 5.20 लाख रुपये अशी असून एका अज्ञात व्यक्तीने या वस्तूंची चोरी केली असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

ही महिला आपल्या कुटुंबासमवेत अहमदाबाद ते कन्नूर या ठिकाणी प्रवास करीत होती. या प्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी भादंसं 356, 379 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान कोकण रेल्वे पोलिसांनी अस्लम कालेगर या वास्कोमधील एका संशयिताला अटक केली आहे. पोलिसांनी महिलेची तब्बल साडेपाच लाख रुपयांची लूट केल्पाप्रकरणी संशयिताची चौकशी सुरु केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT