Goa Narcotic Raid Dainik Gomantak
गोवा

Mapusa: अमली पदार्थ विक्रीसाठी ओडिशातून गोव्यात आला, 10 लाखांच्या मुद्देमालासह 19 वर्षीय तरुणाला अटक

म्हापसा येथील एका रेस्टॉरंटमध्ये तो मदतनीस म्हणून नोकरीला लागला होता

Pramod Yadav

Mapusa: गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 10 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत सुमारे 10 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

गिरी, म्हापसा येथे या पथकाने मंगळवारी छापा टाकला आणि 10 किलो गांजासह 19 वर्षीय ओडिशाचा रहिवासी असलेल्या व्यक्तीला अटक केली, असे पोलिसांनी सांगितले.

रणित नायक (19, रा. ओडिशा) असे अटक व्यक्तीचे नाव आहे. संशयित तरुण एक आठवडाभरापूर्वी अमली पदार्थ घेऊन गोव्यात आला होता. म्हापसा येथील एका रेस्टॉरंटमध्ये तो मदतनीस म्हणून नोकरीला लागला होता, असे पोलिसांनी सांगितले.

संशयित आरोपींनी ओडिशातून अमली पदार्थ आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ओडिशात स्वस्तात गांजा मिळत असल्याने गोव्यात विक्री करण्यासाठी तो आला होता.

तांत्रिक देखरेख आणि एएनसी अधिकार्‍यांकडून संशयितावर सतत निगराणी ठेवण्यात आली होती. सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

"पीओके तात्काळ खाली करा!" UN च्या मंचावरुन भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; मानवाधिकार परिषदेत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचे धुडकावले दावे

Ananta Chaturdashi: अनंताच्या धाग्यात गुंफलेली गोव्याची परंपरा

सॉफ्टवेअरच सर्वेसर्वा?- संपादकीय

SCROLL FOR NEXT