One drowned while celebrating Sao Joao in goa Dainik Gomantak
गोवा

सांजाव साजरा करताना एकाला जलसमाधी!

ही दुर्घटना आज शुक्रवारी दुपारी 4 च्या सुमारास घडली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: सांजाव साजरा करण्यासाठी विहिरीत मारलेली उडी डोंगरी नावेली येथील आशिष रॉड्रिग्स या 19 वर्षीय युवकाच्या जीवावर बेतली. या धाडसात त्याचा प्राण गेला. ही दुर्घटना आज शुक्रवारी दुपारी 4 च्या सुमारास घडली.
(One drowned while celebrating Sao Joao in goa)

डोंगरी नावेली येथे काही युवक सांजाव साजरा करण्यासाठी विहिरीवर आले. या युवकांबरोबर आशिषनेही विहिरीत उडी घेतली. पण तो वर आलाच नसल्याचे समोर आले. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्याचा मृतदेह पाण्यातून वर काढण्यात आला.

सांजावचा सण 24 जून रोजी साजरा केला जातो. पण आज जेजुच्या पवित्र हृदयाचे फेस्त असल्याने काही ठिकाणी हा काल उत्सव साजरा करण्यात आला.

'कोविड' महामारीच्या संकटामुळे निर्बंध आल्याने मागील वर्षी गोव्यातील काही भागात 'सांजाव' वर्षपध्दतीप्रमाणे मोठ्या धुमधडाक्‍यात साजरा करण्यात आला नाही. त्यामुळे सांजाव गीत आणि 'व्हीवा सांजाव 'चा जोष दिसून आला नाही. ख्रिश्‍चन बांधवांनी ' सांजाव ' उत्सव धुमधडाक्‍यात साजरा केला नसला, तरी पारंपरिक रितीरिवाज मात्र केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT