Goa Corona Update
Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update| कोरोनामुळे एकाचा मृत्यू, पाच जण रुग्णालयात

दैनिक गोमन्तक

पणजी: गेल्या तीन महिन्यांपासून कमी जास्त होणाऱ्या कोरोनाचे प्रमाण अद्यापही राज्यात मोठे आहे. आज सोमवारी पाच रुग्णांना अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर एका रुग्णाचा बळी गेला आहे.

(One died due to Corona, five people in hospital)

आज 467 संशयितांच्या चाचण्या केल्या असता कोरोनाचे नवे 52 रुग्ण सापडले आहेत. तर 72 जण कोरोनामुक्त झाले. राज्यातील एकूण कोरोना बाधित्यांची संख्या 570 झाली आहे. आज कोरोनामुळे एकाचा बळी गेल्याने बळींचा आकडा 3964 झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2,56,562 नागरिकांना कोविडची बाधा झाली असून त्यापैकी 2,52,028 लोक पूर्णपणे बरे झालेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध राहून आवश्‍यक ती काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : भाजपमधील मोहरे धोक्यात; लोकसभा निवडणूक निकालानंतर ठरणार नेते-पदाधिकाऱ्यांंचे राजकीय भवितव्य

Panaji News : गोवा घडविण्याची प्रक्रिया अजूनही कायम : राजू नायक

Panaji News : चुकीच्या मानसिकतेचा फेणीला फटका; बारचालकांनी प्रचार, प्रसार करणे गरजेचे

Crime News : गरोदर महिलेला मारहाण, पोलिस स्थानकावर धडक; सखोल चौकशी करण्याची महिलांची मागणी

Goa Rain : कडाक्याच्या उष्म्यावर अवकाळी सरींचा गारवा; १५ मे पर्यंत पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT