Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात आज 180 नवे कोरोना रूग्ण, एक मृत्यू

पॉझिटिव्हीटी रेट 14.09 टक्के

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात गेल्या चोवीस तासांत संपूर्ण राज्यात 180 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर, 115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या वाढून 941 एवढी झाली आहे. आज दिवसभरात एका कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. (One Covid Death, 180 New Cases In Goa Today). गोव्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 14.09 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 54 हजार 531 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 49 हजार 633 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.08 टक्के एवढा आहे. राज्यात कोरोनामुळे 3,957 रूग्ण दगावले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 1,277 प्रयोगशाळा नमुने तपासले आहेत.

तसेच, देशात देखील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 12,608 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 72 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 1 लाख 01 हजार 343 रूग्ण उपचाराधीन आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT