Crime Dainik Gomantak
गोवा

'तिच्या' क्रोधीत EX प्रियकराने नव्या प्रियकराला धोपटलं, परस्परविरोधी गुन्हा दाखल

म्हापशात प्रेमप्रकरणी एकास मारहाण

दैनिक गोमन्तक

म्हापसा : म्हापशातील एका मुलीने पूर्वाश्रमीच्या प्रियकराशी फारकत घेतली होती. तर नवीन प्रियकराशी सूत जुळवले होते. यामुळे पूर्वाश्रमीच्या प्रियकर क्रोधीत झाला.यातून त्याने 'त्या' पूर्वीच्या प्रियकराने स्वत:च्या प्रियसीशी मैत्री जुळवल्याच्या कारणावरून तिच्या नवीन प्रियकराला मारहाण केली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा नोंद केला आहे.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, एका मुलीच्या जुन्या प्रियकराने म्हापसा येथील अलंकार थिएटरजवळील एका फास्टफूड आस्थापनात घुसून फास्टफूडचालक (Fastfood) व त्याच्या मित्रावर हल्ला केला. याप्रकरणी म्हापसा (Mhapsa) पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा (Crime) नोंद केला असून, गौस ऊर्फ शाहरूख खान (धुळेर), तसेच मेहबूब खान पठाण व हुसेन खान पठाण (दोघेही आकय) या तिघा संशयितांना अटक केली आहे. या दोन्ही तक्रारींच्या आधारे म्हापसा पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांना अनुसरून मंगळवारी पहाटेच पोलिसांनी (Police) तिन्ही संशयितांना पकडून अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब व साहाय्यक उपनिरीक्षक रिकी फर्नांडीस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT