Drugs case Dainik Gomantak
गोवा

Mapusa: 2 लाखांच्या अमली पदार्थासह एकाला अटक

कामुर्ली बार्देश येथील एकाला केली अटक

दैनिक गोमन्तक

पणजी: अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज पहाटे धुळेर - म्हापसा येथे गस्तीवर असताना कामुर्ली बार्देश येथील फैयाज नदाफ (27) या तरुणाला अटक करून त्याच्याकडून एक किलो गांजा, 120 ग्रॅम हशिश तेल जप्त केले.

(One arrested at mapusa with drugs worth 2 lakhs)

या अंमलीपदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे 2.20 लाख रुपये असल्याची माहिती या कक्षाचे उपअधीक्षकांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी ड्रग्जविरोधी मोहीम सुरू करून किनारपट्टी परिसरात तसेच शहरामध्ये ड्रग्जचा व्यापार करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई सुरू केली आहे.

आज म्हापसा येथे पोलिस गस्तीवर असताना धुळेर येथे एका तरुणाला ताब्यात घेऊन केलेल्या झडतीत त्याच्याजवळ ड्रग्ज आढळून आले. त्याने हे ड्रग्ज विक्रीसाठी आणले होते. अशी ही माहिती समोर आली आहे.

अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नाही - मुख्यमंत्री

गेल्या काही दिवसात राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले होते की, राज्यातील अमली पदार्थ अन् अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नाही. यासाठी राज्य सरकार पुर्ण प्रयत्न करणार असून या धंद्याना समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्नशिल आहे.

ज्या - ज्या ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. अशी माहिती समोर आल्यास तात्काळ अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मात्र पुन्हा असे प्रकार समोर येत आहेत. त्यामूळे राज्य सरकार काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात पुन्हा भाषावादाचा 'वणवा' पेटणार? 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे! मराठी राजभाषेच्या मागणीसाठी 'एल्गार'

IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

Saptank Yog: शुक्र-शनीचा 'सप्तांक योग'! 24 एप्रिलपासून 'या' 3 राशींच्या नशिबात सुवर्णकाळ; गुंतवणुकीतून मिळणार छप्परफाड परतावा

VIDEO: खेळपट्टी की मृत्यूचा सापळा? हेल्मेटला चेंडू लागताच फलंदाज जमिनीवर कोसळला अन् थेट रुग्णालयात पोहोचला; धोकादायक पीचमुळे सामना रद्द

SCROLL FOR NEXT