Harvalem Waterfalls: हरवळे धबधबा ठरतोय ‘कर्दनकाळ’  Dainik Gomantak
गोवा

हरवळे धबधबा ठरतोय ‘कर्दनकाळ’

सहा महिन्यांत चार बळी; पुन्हा एकदा हरवळेत बुडुन युवकाचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

डिचोली: आंघोळीसाठी दिवसेंदिवस असुरक्षित बनलेल्या हरवळे धबधब्याने (Harvalem Waterfalls) शुक्रवारी आणखी एक बळी घेतला आहे. सर्वत्र दसऱ्याचा उत्साह असतानाच, पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या धबधब्यावर आंघोळीची मजा लुटण्यासाठी आलेल्या २१ वर्षीय युवकाचा दुर्दैवीरित्या बुडून मृत्यू झाला. अन्य एक जण बचावला. हरवळे येथे गेल्या सहा महिन्यांतील हा चौथा बळी ठरला.

अखिलेश जगदीश शर्मा असे या बुडालेला युवकाचे नाव आहे. तो वास्को येथील नौदल कॅम्प मध्ये राहत होता. अखिलेश हा एका नौदलाच्या अधिकाऱ्यासह आंघोळीसाठी हरवळे धबधब्यावर आला होता. दोघेही पाण्यात उतरले त्यांना पाण्याची अंदाज आला नाही. अखिलेश बुडला, त्याचा साथीदार बचावला. या घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाने धाव घेतली. अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली राजन परब यांच्या नेतृत्वाखाली विशांत वायंगणकर, महेश नाईक, संदीप गावस आणि शैलेश साळकर या जवानांनी गळ टाकून मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीयेथे पाठवला. दरम्यान, हरवळे येथे वाढत चाललेल्या बळींमुळे सरकारने येथे कडक उपाय योजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT