Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction: ‘त्या’ बंगल्यावर बुलडोझर

Illegal Construction: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाळपई पालिकेची कारवाई

दैनिक गोमन्तक

Illegal Construction:

वाळपई गेल्या एक वर्षापासून गाजत असलेल्या वाळपई नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 9 मधील म्हाऊस मार्गावरील मुबारक अली खान यांच्या बेकायदेशीररीत्या बांधलेल्या बंगल्यावर मंगळवारी (ता.१२) अखेर वाळपई नगरपालिकेने धडक कारवाई करत बंगल्यावर बुलडोझर फिरविण्यास सुरवात केली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळपासून बंगला पाडण्याची कारवाई करण्यात आली. गेल्या एक वर्षापासून हा बंगला पाडण्यासाठी तीनवेळा कारवाई झाली होती. मात्र, अनेक घडामोडीनंतर मंगळवारी प्रत्यक्षात या कारवाईला सुरवात झाली.

सकाळच्या सत्रात खान कुटुंबीयांनी बंगल्यातील साहित्य बाहेर काढले नव्हते. मात्र, बंगल्यात साहित्य असतानाच दुसऱ्या बाजूने तो पाडण्यास सुरुवात केली. त्यानंतर साहित्य बाहेर काढल्यावर दुपारी ३ वा.च्या सुमारास कारवाई करताना बुलडोझर फिरविण्यास सुरवात करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी सूर्याजीराव राणे, संयुक्त मामलेदार सुरेंद्र गावकर, पालिका अभियंता हरिष, वाळपई पोलिस निरीक्षक राहुल नाईक तसेच पालिकेतील कर्मचारी व मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते. अखेर शांततेत कारवाईला सुरवात झाली.

4 ते 5 दिवसांत बंगला जमीनदोस्त

गेल्या एक वर्षापासून हे प्रकरण गाजत असून अनेकवेळा बंगला पाडण्याचा आदेश जारी करूनही पुन्हा पुन्हा त्याला स्थगिती मिळत होती. मात्र, मंगळवारी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंगला पाडण्यास सुरवात करण्यात आली. आणखी 4 ते 5 दिवसांत बंगला जमीनदोस्त केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT