Goa Teachers Day Award 2023 Dainik Gomantak
गोवा

Teacher's Day 2023: शिक्षक दिनानिमित्त राज्यातील 8 शिक्षकांना मुख्यमंत्री वशिष्ट गुरु पुरस्कार जाहीर

Goa Teachers Day Awards 2023: राजभवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार

Kavya Powar

Goa Teachers Day Award 2023: 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 8 शिक्षकांना मुख्यमंत्री वशिष्ट गुरु पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 5 शिक्षिका आणि 4 शिक्षकांचा समावेश आहे.

शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांची माहिती देण्यात आली आहे.

उद्या (5 सप्टेंबर) राजभवनच्या दरबार हॉलमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांची नावे :

प्राथमिक शिक्षक

1. हर्षिता हरिश्चंद्र नाईक (उ. गोवा)

सरकारी प्राथमिक शिक्षिका, सरकारी प्राथमिक शाळा, पार्से, पेडणे.

2. सोनिया संजय माणगावकर (द. गोवा)

सहाय्यक शिक्षिका, सरकारी प्राथमिक शाळा, मडगाव.

माध्यमिक शिक्षक

3. प्रेमानंद कुमू नाईक (उ. गोवा)

शारीरिक शिक्षण शिक्षक, केशव सेवा साधना विशेष मुलांची शाळा, सर्वण, डिचोली.

4. आंतोनेत डिसुझा (उ. गोवा)

सहाय्यक शिक्षिका, अवर लेडी ऑफ द रोझरी हाय स्कूल, दोना पावला.

5. उमेशा सावळ (द. गोवा)

सहाय्यक शिक्षिका, सरकारी माध्यमिक विद्यालय, फातर्पा, केपे.

मुख्याध्यापक

6. नीता गणपती साळुंके (उ. गोवा)

मुख्याध्यापिका, एल. डी. सामंत मेमोरियल हाय स्कूल, विद्यानगर, पर्वरी.

7. सुचित्रा राजीव देसाई (द. गोवा)

मुख्याध्यापिका, पॉप्युलर हाय स्कूल, मडगाव.

उच्च माध्यमिक शिक्षक

8. दत्ता चंद्रकांत परब (गोवा)

शिक्षक (ग्रेड 1), श्री शांतादुर्ग उच्च माध्यमिक शाळा, पिर्णा, बार्देश.

प्राथमिक, माध्यमिक, मुख्याध्यापक आणि उच्च माध्यमिक अशा प्रवर्गातील एकूण 8 शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दारम्यान, उद्या सकाळी 11 वाजता हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

Goa Accident: गुगल मॅपची वाट, कोलवाळात घात! मद्यधुंद स्‍कॉर्पिओचालकाची स्कूटरला धडक; मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू, पती अन् मुलगी जखमी

Horoscope 5 October 2026: सोमवारी 'या' राशींवर बरसणार महादेवाची कृपा; धनलाभ आणि प्रगतीचे उत्तम योग!

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

SCROLL FOR NEXT