Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: वाहनचालकांच्या 'या' कृतीविरोधात काणकोण ट्राफिक पोलिस अ‍ॅक्शन मोडवर, वाचा सविस्तर

वाहनांवरील हाय पॉवर लाईट्स विरोधात ट्राफिक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Police गोव्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ट्राफिक पोलीस अपघात रोखण्यासाठी मोठ्या शिकस्तीने प्रयत्न करीत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस सक्रिय झाले असून याचा प्रत्यय आज काणकोणात बघायला मिळाला. वाहनांवरील हाय पॉवर लाईट्स विरोधात काणकोण ट्राफिक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.

रात्रीच्या वेळी तीव्र प्रकाशझोतामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून अशा घटना टाळण्यासाठी ट्राफिक पोलीस आता अक्शन मोडवर आहेत. कंपनीतून मिळणाऱ्या लाईट्स शिवाय एक्सट्रा लाईट बसवणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आलीय.

गोव्यात आलेल्या कर्नाटकातील टेम्पो ट्रॅव्हलर, माल वाहक अशा काही वाहनांवर कारवाई करण्यात आली. यावेळी वाहनचालकांकडून कोणताही दंड वसूल न करता केवळ त्यांच्याकडून वाहनावरील लाईट्स काढून त्यांना समज देण्यात आली.

यापुढे ही कारवाई अशीच सुरु ठेवण्यात येणार असून लहान-मोठ्या गाड्यांवर ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती काणकोण ट्राफिक पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT