Omkar Elephant In Goa Dainik Gomantak
गोवा

Elephant In Goa: बिथरलेला ‘ओंकार’ हत्ती गोव्यात दाखल! मोपाच्या जंगल भागात ठोकला मुक्काम; Watch Video

Omkar Elephant In Goa: बिथरलेल्या ‘ओंकार’ या टस्कराने दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. त्याने आपला मुक्काम सावंतवाडी तालुक्यातील डोंगरपाल या गावात हलवला.

Sameer Panditrao

दोडामार्ग: बिथरलेल्या ‘ओंकार’ या टस्कराने दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. त्याने आपला मुक्काम सावंतवाडी तालुक्यातील डोंगरपाल या गावात हलवला. याशिवाय आणखी पाच हत्तींचा कळप घोडगे येथे धुडगूस घालतच आहे. आता तो गोव्याच्या हद्दीत घुसला आहे.

हत्तींचा कळप सर्वसाधारणपणे ऑगस्टमध्ये कर्नाटककडे परततो. यंदा मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या सहा हत्तींच्या कळपाने आपला मुक्काम कायम ठेवला आहे. या कळपापासून गेले काही दिवस वेगळा फिरणाऱ्या ओंकार या हत्तीने एका रात्रीत कित्येक एकर शेती पायदळी तुडवत धुमाकूळ घातला. नवा मार्ग शोधत त्याने थेट गोव्याच्या हद्दीपर्यंत मजल मारली. त्याची भर दिवसादेखील भ्रमंती सुरू असल्याने ग्रामस्थांची भंबेरी उडाली आहे.

भरकटलेला ओंकार हत्ती गोव्यात दाखल झाला आहे. मोपा लगतच्या जंगल भागात त्याचा वावर आहे असे सिंधुदुर्ग वन‌ खात्याकडून कळवण्यात आले आहे. त्या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले गेले आहे.

ओंकार हत्ती शनिवारी दिवसभर नेतर्डे परिसरात ठाण मांडून असल्याने गोवा वन विभागाचे पथक सतर्क झाले आहे. हा परिसर गोवा सीमेलगत असल्याने व या परिसरात पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच समृद्ध बागायती असल्याने ओंकार कोणत्याही क्षणी गोवा हद्दीत प्रवेश करण्याच्या पार्श्वभूमीवर गोवा वन खात्याचे पथक सीमेवर सतर्क झाले होते. गोवा वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी मिळून बारा जणांचे पथक सीमेवर गस्त घालत आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री १० पासून ओंकारचा गोव्याच्या सीमेलगत वावर असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agricultural College: अभिमानास्पद! गोवा कृषी महाविद्यालयाला ICAR ची अधिमान्यता, मिळणार राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

Goa Crime: 'मी मैत्रिणीच्या घरी होते'! पीडितेने दिली नाही साथ, अपुरे पुरावे; अल्पवयीन मुलीच्या अपहरण, अत्याचारप्रकरणी आरोपी निर्दोष

Goa Today News Live: राजस्थानी पर्यटक रेंटने घेतलेली कार घेऊन झाला फरार?? पोलिस तक्रार दाखल

Sattari: '..काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो'! वयाच्या सत्तरीतही शेतीचा जिव्हाळा; गुळेलीतील महिलेची श्रमगाथा

Mapusa Theft: बंगल्यात घुसून सशस्त्र दरोडा, 35 लाख लुटले! गोवा पोलिसांची पथके बंगाल, हैदराबाद, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मुंबईमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT