Onkar Elephant Dainik Gomantak
गोवा

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

Onkar Elephant: खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन दिवस जीव ओतून केलेल्या प्रयत्नांत अ‍ॅटम बॉम्ब वाजवले, फटाके लावले, मोठ्या आवाजाने जंगल दणाणून सोडले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पेडणे: मोपा परिसरात गेले दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या 'ओंकार' हत्तीने स्थानिक ग्रामस्थ आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः झोप उडवली होती. अखेर आज सोमवारी पहाटेपासून सुरू झालेल्या रोमहर्षक मोहिमेत या भल्या मोठ्या हत्तीला महाराष्ट्राच्या हद्दीत परतवण्यात वन खात्याच्या पथकाला यश आले.

खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन दिवस जीव ओतून केलेल्या प्रयत्नांत अ‍ॅटम बॉम्ब वाजवले, फटाके लावले, मोठ्या आवाजाने जंगल दणाणून सोडले... आणि शेवटी 'ओंकार'ने महाराष्ट्राच्या दिशेने वाट घरली.

पहाटेच सुरू झालेल्या मोहिमेत सुरुवातीला हत्ती वन खात्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत होता. तो महाराष्ट्राच्या हद्दीकडे निघालाही, पण अचानक आडवे आले पाण्याचे कालवे! त्यामुळे हत्तीने थोडा वेळ कुरघोडी केली.

मात्र, वनकर्मचाऱ्यांचा पिच्छा सुरूच राहिला. शेवटी, पाटाजवळून मार्ग काढत हा हत्ती सिंधुदुर्गातील खोलबाग-नेतर्डे या सीमावर्ती गावात शिरला. सकाळी सहाच्या सुमारास त्याने सरळ महाराष्ट्राचा मार्ग धरला.

आता परत येऊ नकोस रे बाबा!

मोपा परिसरातील ग्रामस्थ मागील दोन दिवसांपासून घेतलेल्या धसक्यातून अजूनही सावरलेले नाहीत. शेते व रस्ते यावरून फिरणारा हा हत्ती कुठल्याही क्षणी पुन्हा येऊ नये, अशी गावकऱ्यांची प्रार्थना सुरू आहे. वन खात्याचे कर्मचारी मात्र अजूनही मोपा परिसरात तळ ठोकून बसले आहेत. कारण हत्तीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कसा आला हत्ती गोव्यात?

शुक्रवारी (१२ सप्टेंबर) दुपारी ३.३० वाजता हा हत्ती नेतर्डे धनगरवाडी परिसरातून कडशी-मोपा मार्गे गोव्याच्या हद्दीत शिरला होता. त्यानंतर त्याने परिसरात खळबळ उडवून दिली होती. दोन दिवसांच्या तगड्या मोहिमेनंतर अखेर तो महाराष्ट्राच्या हद्दीत त्याला पिटाळण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

Goa News: झुआरीनगर येथे कारच्या धडकेत महिला जखमी; वाचा दिवसभरातील घडामोडी

Maruti Victoris Launched: मायलेज, सेफ्टी आणि फीचर्सचा परफेक्ट कॉम्बिनेशन, मारुती सुझुकीने लाँच केली SUV 'व्हिक्टोरिस'

SCROLL FOR NEXT