Omkar Elephant Update Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: ...अखेर 'ओंकार' आपल्‍या कळपात, वन अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्र्वास

Omkar Elephant Update: दोडामार्ग परिसरातून गोव्‍यात ये–जा करीत पेडणे तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केलेला ओंकार हत्ती अखेर आपल्‍या कळपात परतला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: दोडामार्ग परिसरातून गोव्‍यात ये–जा करीत पेडणे तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केलेला ओंकार हत्ती अखेर आपल्‍या कळपात परतला. त्‍यामुळे गोवा आणि महाराष्‍ट्र या दोन्‍ही राज्‍यांतील वन खात्‍यांच्‍या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

कळपापासून दुरावलेल्‍या ओंकार हत्तीने १३ सप्‍टेंबर २०२५ रोजी सर्वप्रथम महाराष्‍ट्रातून गोव्‍यात प्रवेश केला. पेडणे तालुक्‍यात येणाऱ्या मोपा, तांबोसे आदी भागांत काही वावर करून आणि या भागातील शेतीची नासधूस करून २८ सप्‍टेंबर रोजी पुन्‍हा महाराष्‍ट्रात परतला होता.

त्‍यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळालेला असतानाच, ओंकारने ३१ नोव्‍हेंबर रोजी पुन्‍हा गोव्‍यात आगमन केले. त्‍यानंतर १० डिसेंबर रोजी तो गोव्‍यातून पुन्‍हा बांबर्डे–दोडामार्ग येथे गेला होता. काहीच दिवसांपूर्वी तो आपल्‍या कळपात सहभागी झालेला असल्‍यामुळे महाराष्‍ट्र आणि गोवा या दोन्‍ही राज्‍यांतील वन खात्‍यांच्‍या अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ओंकार हत्तीने गोव्‍यातील आपला मुक्काम मोपा, तांबोसे, उगवे या भागांतच ठेवलेला होता. दिवसाढवळ्या तो लोकवस्‍तीतही घुसत होता. आपल्‍या मुक्कामात त्‍याने पेडणे तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांच्‍या भातशेतीचे नुकसान केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT