Omkar Elephant Dainik Gomantak
गोवा

VIDEO: 'तो' परत आलाय! गोवा-महाराष्ट्र सीमाभागात पुन्हा 'ओंकार हत्ती'चा वावर; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

Omkar Elephant: गोवा-महाराष्ट्र सीमाभागात पुन्हा एकदा ‘ओंकार’ हत्तीच्या हालचालींनी खळबळ उडाली आहे. ओंकार हत्तीने आपला मोर्चा पुन्हा गोव्याच्या दिशेने वळवत कळणे सडा येथे हजेरी लावली.

गोमन्तक डिजिटल टीम

Omkar Elephant Spotted Goa Maharashtra Border : गोवा-महाराष्ट्र सीमाभागात पुन्हा एकदा ‘ओंकार’ हत्तीच्या हालचालींनी खळबळ उडाली आहे. ओंकार हत्तीने आपला मोर्चा पुन्हा गोव्याच्या दिशेने वळवत कळणे सडा येथे हजेरी लावली. बांदा राज्यमार्गावर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

अनेकांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले. काही महिन्यांपूर्वीही ओंकारने गोव्याची हद्द ओलांडून स्थानिकांमध्ये आकर्षण निर्माण केले होते. विशेष म्हणजे, एकटाच फिरणारा ओंकार पुन्हा एकदा कळपापासून दूर झाल्याचे दिसून येत आहे.

तो सासोली परिसरात पोहोचला होता, तर उर्वरित पाच हत्ती दोन वेगवेगळ्या कळपांमध्ये विभागले गेले आहेत. त्यामुळे वन विभागाचे लक्ष या हालचालींकडे लागले आहे. दरम्यान, सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे परिसरात ओंकारने तळ ठोकल्याची माहिती समोर आली आहे. गोव्यातील हणखणे मार्गे त्याने या भागात प्रवेश केला.

काजू हंगाम सुरू असताना हत्तीच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT