Omkar elephant Goa Dainik Gomantak
गोवा

Omkar elephant Goa: तांबोसेतील मळ्यात 'ओंकार हत्ती'चे बस्तान! बागायतीचे नुकसान सुरूच; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

Elephant In Goa: सिंधुदुर्ग-महाराष्ट्राच्या सीमेमधून ओंकार हत्ती मागच्या आठ दिवसांपूर्वी पेडणे तालुक्यातील कडशी, मोपा, तोरसे, तांबोसे या भागात भ्रमण करून बागायतीची नासधूस करत आहे.

Sameer Panditrao

मोरजी: सिंधुदुर्ग-महाराष्ट्राच्या सीमेमधून ओंकार हत्ती मागच्या आठ दिवसांपूर्वी पेडणे तालुक्यातील कडशी, मोपा, तोरसे, तांबोसे या भागात भ्रमण करून बागायतीची नासधूस करत आहे. दुसऱ्या बाजूने वन खात्याचे अधिकारी कर्मचारी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांना यश मिळत नाही.

तांबोसेतील शेताच्या मळ्यात थेट तिसऱ्या दिवशीही ओंकार हत्तीने बस्तान मांडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीची नुकसानी केली. शेतकरी आपल्या शेतामध्ये जाण्यास घाबरतात. आता शेताबरोबरच ओंकार हत्तीने पोफळी-केळींची नासधूस करायला सुरुवात केली आहे.

तर दुसऱ्या बाजूने वन खात्याचे अधिकारी वारंवार शेतकऱ्यांना आवाहन करतात की तुम्ही जमाव करून शेताच्या मळ्यात जाऊ नका. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकार देणार, अशा पद्धतीची ग्वाही वन खात्याचे अधिकारी देत असतात.

दरम्यान, तिसऱ्या दिवशी ओंकार हत्तीने शैलेश सामंत, शामसुंदर धुरी, दिलीप सामंत या शेतकऱ्यांची शेती, केळी, सुपारी, नारळाची झाडे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या दिवसापासून हत्तीचे आगमन मोपा, कडशी, तोरसे, तांबोसे या भागात झाले त्या वेळेपासून वन खात्याचे कर्मचारी हातात ॲटमबॉम्ब घेऊन ओंकार हत्तीला पिटाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

तज्ज्ञांची टीम बोलवा!

ओंकार हत्तीला पकडण्यासाठी वन खात्याने तज्ज्ञ हत्तींची टीम बोलावून त्याला ज्या भागात सोडायचे आहे, ते काम आता वन खात्याने करावे. केवळ ॲटमबॉम्ब लावून शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण तयार करू नये, अशी मागणी शेतकरी उदय महाले यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT