Omicron Cases in Goa

 
Dainik Gomantak
गोवा

जीनोम  सिक्वेन्सिंगचे 2 हजार नमुने प्रलंबित

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून तिथे पाठवलेले कोरोनाबाधितांचे 2 हजारांपेक्षा जास्त नमुने प्रलंबित आहेत

अनिल पाटील

पणजी: कोरोना व्हेरियंटचा तपशीलवार तपास व शोध लावणारी जीनोमिक सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा राज्यात नाही. सध्यातरी या रिपोर्टसाठी आयसीएमआर ठरवून दिलेल्या पुण्याच्या  राष्ट्रीय विषाणू  प्रयोगशाळेवर (एनआयव्ही) अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, धक्कादायक बाब  म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून तिथे पाठवलेले कोरोनाबाधितांचे 2 हजारांपेक्षा जास्त नमुने प्रलंबित आहेत. त्यामुळे स्ट्रेन  समजण्यास वेळ लागत आहे. राज्यात अशा प्रयोगशाळेची नितांत गरज आहे. गेल्या वर्षभरापासून याबाबत केवळ आश्वासनेच ऐकायला मिळत आहेत. 

जीनोमिक सिक्व्हेन्सिंग रिपोर्टसाठी राज्यातून दर 15 दिवसांनी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे बाधितांचे नमुने पाठवले जातात. अलीकडे ओमिक्रॉनचा (Omicron Variant) प्रभाव वाढल्याने जास्त रुग्ण मिळणाऱ्या क्लस्टर आणि प्रदेशातून आलेल्या सर्वांचे नमुने पाठवले जात आहेत. या प्रयोगशाळेत महाराष्ट्र आणि इतर राज्यातून नमुन्यांची तपासणी होत असल्याने व एका नमुन्याच्या तपासासाठी सहा ते सात दिवस लागत असल्याने प्रयोगशाळेवर ताण आहे. त्यामुळे नमुन्यांचा रिपोर्ट येण्यासाठी दोन-दोन महिन्यांच्या अवधी लागत आहे. सध्या राज्यातून गेलेले 2 हजारांपेक्षा जास्त नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली आहे.

लॅबची नितांत गरज

कोरोनाचा (Corona) संसर्ग व सुरू झालेली तिसरी लाट या पार्श्वभूमीवर व्हायरॉलॉजी लॅबची (Virology Lab) नितांत गरज आहे. आरोग्य खात्याने मायक्रोबायोलॉजी (Microbiology) विभागाजवळील जागा प्रयोगशाळेसाठी निश्चित केली असून यासाठी लागणाऱ्या निगेटिव्ह प्रेशर बायोसेफ्टी कॅबिनेट संदर्भातले सिव्हिल काम पूर्ण झाले आहे. यासाठी लागणारी एक मशिन अमेरिका स्थित कंपनी मोफत देणार आहे. प्रत्यक्षात ही प्रयोगशाळा कधी बनणार हा प्रश्न कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Floods: नेपाळच्या महापुरातून 21 भारतीयांची सुखरुप सुटका, परराष्ट्र मंत्रालयाकडून यादी जाहीर; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

RGP Goa: काँग्रेससोबत आघाडीसाठी 'आरजी'ची तयारी! अमोल नावेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती; 30 दिवसांत चर्चा पूर्ण करण्याची मागणी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

SCROLL FOR NEXT