वीजखांब  Dainik Gomantak
गोवा

पाळोळेत जुने वीजखांब गंजले; बदलण्याची मागणी

सर्वाधिक वीज खांब खाऱ्या हवामानाचा परिणाम जाणवणाऱ्या किनारी भागात आहेत.

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण तालुक्यातील चाळीस वर्षांपूर्वी घातलेले बहुतेक वीज खांब गंजलेल्या अवस्थेत असून ते कोणत्याही क्षणी मोडून मोठी दुर्घटना होऊ शकते.सर्वाधिक वीज खांब खाऱ्या हवामानाचा परिणाम जाणवणाऱ्या किनारी भागात आहेत.

पाळोळे भागात अशा प्रकारचे धोकादायक वीज खांब असल्याचे ते त्वरीत बदलण्याची मागणी पाळोळे येथील गास्पार कुतिन्हो यांनी येथील सहाय्यक वीज अभियंत्याकडे केली होती. त्याप्रमाणे पाळोळे येथील एक गंजलेला धोकादायक वीज खांब वीज कर्मचाऱ्यांनी बदलला. त्याचप्रमाणे अन्य खांबही तातडीने बदलण्याची गरज येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. काही खांब लोखंडी असून ते याच प्रमाणे गंजलेल्या अवस्थेत आहेत. त्याच्या जागी नवीन खांब बसवण्याची गरज आहे.

गालजीबाग, तळपण, राजबाग, ओव्हरे, पाटणे, पाळोळे, आगोंद या किनारी भागात भूमिगत वीज वाहिन्या घालून या प्रश्नाबरोबरच खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न सोडविणे गरजेचेआहे.आगोंद पंचायत क्षेत्रात किनारी भागातील पर्यटन व्यावसायिकांना खंडित आणि कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे त्रास होतो, असे कॉंग्रेसचे नेते जनार्दन भंडारी यांनी सांगितले. खंडित वीजपुरवठ्याची समस्या सोडवण्याची मागणीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT