Old Lady Rider Died In Navelim Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: मुलीला महाविद्यालयात सोडण्‍यासाठी जाताना फांदी पडून आई ठार; नावेलीतील घटना

Goa Accident: कुंकळ्ळीतील सिल्वा कुटुंबावर शोककळा; विद्यालयात जाताना दुर्घटना

दैनिक गोमन्तक

Navelim Accident News: पाऊस पडत असताना आलेल्‍या सोसाट्याच्‍या वाऱ्यामुळे मडगाव - नावेली हमरस्‍त्‍यावर मंगळवारी सकाळी एका झाडाची फांदी धावत्या दुचाकीवर पडून सालझोरा - कुंकळ्‍ळी येथील ओडेलिया सिल्‍वा (वय ५९) ही महिला ठार झाली.

तर दुचाकीवर मागे बसलेली तिची मुलगी लसिता गंभीर जखमी झाली. लसिता हिला दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात दाखल करण्यात आले असून तिच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. नावेली जंक्‍शनवरील ‘हॉटेल सुरक्षा’समोर मंगळवारी सकाळी पावणेनऊ वाजण्‍याच्‍या सुमारास ही दुर्घटना घडली.

सकाळी या परिसरात जोराचा पाऊस सुरू झाला होता आणि वारेही सुटले होते. ओडेलिया तिच्‍या मुलीला महाविद्यालयात सोडण्‍यासाठी स्‍कूटरवरून जात होती. त्‍यावेळी त्यांच्यावर अकस्‍मात झाडाची फांदी मोडून पडली.

अपघातानंतर रस्‍त्‍यावर वाहतुकीची कोंडी झाल्‍याने जखमींना घेऊन जाण्‍यासाठी बोलावलेली १०८ रुग्‍णवाहिका बऱ्याच उशिरा पोहोचली. त्‍यामुळे जखमींची प्रकृती अधिकच गंभीर झाली, अशी माहिती स्‍थानिकांनी दिली.

त्‍यानंतर त्‍या दोघींनाही जखमी अवस्‍थेत दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात आणले असता तिथे ओडेलिया हिचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्‍यात आले.

‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’

या मृत्‍यूला दक्षिण गोवा जिल्‍हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम खाते आणि वन खाते कारणीभूत असल्‍याचा आरोप ग्रीन गोवा फाउंडेशन या संघटनेने केला आहे.

या रस्‍त्‍याच्‍या कडेला असलेली झाडे धोकादायक असल्‍याचे या तिन्‍ही खात्‍यांना वेळोवेळी कळवूनही त्‍यांनी कोणतीच उपाययोजना केली नाही.

त्‍यामुळे हा अपघात घडला असा आरोप करून या खात्‍यांतील संबंधितांवर पोलिसांनी सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे.

"२०११ पासून मडगाव - नावेली हमरस्त्याशेजारी असलेल्‍या धोकादायक झाडांबद्दल आमच्‍या संघटनेने वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्‍याकडे प्रत्‍येकवेळी दुर्लक्ष झाले. यापूर्वीही झाडांच्‍या अशा फांद्या मोडून पडून या रस्‍त्‍यावर अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. त्‍यातील काहींना जीवही गमवावा लागला आहे."

- रेझन आल्‍मेदा, अध्यक्ष, ग्रीन गोवा फाउंडेशन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT