mud house wall collapse in margao Dainik Gomantak
गोवा

Wall Collapses In Margao: पावसाचा तडाखा; मातीच्या घराची भिंत कोसळली

Margao: नगरपालिकेच्या मजुरांनी माती काढून रस्ता वाहतुकीस मोकळा केला

गोमन्तक डिजिटल टीम

कोंब येथे महिला नूतन हायस्कूल जवळ एक जुनी मातीची भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने माती रस्त्यावर आली. नगरपालिकेच्या मजुरांनी माती काढून रस्ता वाहतुकीस मोकळा केला. मडगावचे आमदार दिगंबर कामत व स्थानिक नगरसेवक सगुण नायक यांनी पाहणी केली. या भिंतीचा आणखी भागसुद्धा पडण्याची शक्यता आहे.

या संदर्भात बोलताना आमदार दिगंबर कामत म्हणाले की, या भिंती १०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वीच्या आहेत. तसेच अशी कित्येक मातीच्या भिंतीची अनेक घरे आहेत. मात्र या भिंतींची व घरांची वेळीच डागडुजी, दुरुस्ती करण्याची जबाबदारी घरमालकांची असते.

कोंब भागातही अशी अनेक जुनी घरे आहेत. त्या घरात कोणीही राहत नाही. काही घरे कौटुंबिक प्रश्नांमुळे व वादविवादामुळे तशीच दुरुस्तीविना पडलेली आहे. काही घरे अशी आहेत ज्यांच्या भिंतीतून मोठी झाडे उगवली आहेत व ही झाडे धोकादायक परिस्थितीत आहे. असाच पाऊस पडत राहिला तर झाडाबरोबर घराच्या भिंतीही कोसळण्याची व अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT