Old Goa 21 Illegal Houses Dainik Gomantak
गोवा

Old Goa: बेकायदेशीर घरे पाहणीला गेल्यावर सापडली दोन जुनी बांधकामे! जुन्या गोव्यातील विचित्र प्रकार; सखोल तपासाची मागणी

Old Goa Panchayat: जुने गोवे येथे बेकायदेशीरपणे २१ घरांना घर क्रमांक देण्याचा विषय प्रकाशात आल्यानंतर पंचायतीकडून पाहणी करण्यात आली. तिसवाडी गट विकास अधिकाऱ्यांच्या (बीडीओ) आदेशावरून पाहणी केली असता तेथे २०० मीटरची दोन जुनी बांधकामे आढळली.

गोमन्तक डिजिटल टीम

Panchayat Conducts Inspection After Illegal House Numbering in Old Goa

तिसवाडी: जुने गोवे येथे बेकायदेशीरपणे २१ घरांना घर क्रमांक देण्याचा विषय प्रकाशात आल्यानंतर पंचायतीकडून पाहणी करण्यात आली. तिसवाडी गट विकास अधिकाऱ्यांच्या (बीडीओ) आदेशावरून पाहणी केली असता तेथे २०० मीटरची दोन जुनी बांधकामे आढळली.

पंचायतीने त्याची नोंद घेतली असून लवकरच अहवाल बीडीओ कार्यालयाला सादर केला जाईल. या पाहणीसाठी सरपंच मेघा पर्वतकर, उपसरपंच विश्वास कुट्टीकर, प्राभग पंचसदस्य सारिका नाईक, पंचायत सचिव सुबोध प्रभू, तक्रारदार ग्लेन काब्राल, मारियान फेर्रांव आणि जॉन मास्कारेन्हस उपस्थित होते.

बेकायदा घरांना घर क्रमांक देण्याचा विषय प्रकाशात आल्यानंतर यावर्षी जानेवारीमध्ये पाहणी करण्याची नोटीस श्वेता इस्टेटला बाजवली होती; परंतु बीडीओ कार्यालयात आव्हान दिल्याने पाहणी करता आली नव्हती. बीडीओनी सोमवारी सकाळी १०.३० वा. पाहणी करण्याचा आदेश दिल्यानंतर ती करण्यात आली.

यावेळी ग्लेन काब्राल यांनी सांगितले की, येथे कोणतीही घरे नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. फक्त दोन जुनी बांधकामे येथे असून सुमारे २०० मीटरची ती असणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जुने गोवेतील प्रत्येक प्रभागातील सर्वेक्षण करून, घरे मोजून त्यांची माहिती गुगल मॅपवरती टाकावी, जेणेकरून किती बेकायदेशीर घरे आहेत ते स्पष्ट होईल.

सखोल तपास व्हावा!

ज्या ठिकाणी घरेच नाहीत तेथे घरक्रमांक देण्याचा प्रकार हा धक्कादायक असून २००५ पासून चौकशी झाली पाहिजे. जुने गोवे जागतिक वारसा स्थळ असून येथे बांधकाम करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून परवानगी घ्यावी लागते. त्यात ‘सीआरझेड’ही लागू होत असल्याने कोणत्या आधारावर परवानगी दिली याचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी जॉन मास्कारेन्हस यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SCROLL FOR NEXT