Goa AAP Leader Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan Case: अमित पालेकर हाजीर हो! सुलेमान खान व्हिडिओ प्रकरणी पोलिसांचे तिसऱ्यांदा समन्स

Goa AAP Leader Amit Palekar Summoned: सुलेमान खानला कोठडीतून फरार होण्यास मदत करणाऱ्या आयआरबी कॉन्स्टेबलला सेवेतून बडतर्क करण्यात आले.

Pramod Yadav

जुने गोवा: भू-बळकाव प्रकरणातील मास्टरमाईंड आणि पोलिसांच्या कोठडीतून फरार झालेल्या सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याच्या व्हिडिओ प्रकरणात आप नेते अमित पालेकरांना तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला आहे. जुने गोवा पोलिसांनी पालेकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुलेमान खान आयआरबी कॉन्स्टेबलच्या मदतीने गुन्हे शाखेच्या कोठडीतून फरार झाला होता.

सुलेमान खान फरार झाल्यानंतर तो कर्नाटक असल्याची माहिती समोर आली होती. त्याला सुरुवातीला आयआरबी कॉन्स्टेबल आणि त्यानंतर आणखी एका व्यक्तीने मदत केली होती. दरम्यान, सुलेमानच्या अटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना त्याचा एक व्हिडिओ मिळाला होता. हा व्हिडिओ सुलेमान खानने सुरुवातीला आप नेते अमित पालेकरांना दिल्याचे उघडकीस आले होते. तर, काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांनी हा व्हिडिओ सार्वजनिक केला होता.

सुलेमान खानने अमित पालेकरांनाच हा व्हिडिओ का दिला? याप्रकरणी त्यांची चौकशी केली जात आहे. याबाबत प्रथम सुनील कवठणकर यांची देखील चौकशी करण्यात आली होती. तसेच, पालेकरांची देखील दोनवेळा चौकशी झाली होती. दरम्यान, आता तिसऱ्यांदा याबाबत पालेकरांना समन्स बजावण्यात आला आहे. आज (०८ जानेवारी) सकाळी अकरा वाजता पालेकर यांना जुने गोवा पोलिस स्थानकात हजर राहण्यास सांगितले आहे.

सुलेमान खानला कोठडीतून फरार होण्यास मदत करणाऱ्या आयआरबी कॉन्स्टेबलला सेवेतून बडतर्क करण्यात आले. सुलेमानला फरार करण्यासाठी तीन कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, याप्रकरणात अनेक पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप सुलेमान खानने त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. दरम्यान, पोलिस सध्या या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT