Divar Island Open Drinking Case Dainik Gomantak
गोवा

Divar Island: उघड्यावर मद्यपान पडले महागात; दीवार बेटावर 14 जण पोलिसांच्या ताब्यात

दीवार बेटावर पोलिसांनी तळीरामांना चांगलीच अद्दल घडवली आहे.

दैनिक गोमन्तक

Divar Island Open Drinking Case : राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी गोवा पोलीस नेहमीच सतर्क असतात. गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यास सक्त मनाई असूनही अनेकजण या नियमाचे उल्लंघन करताना दिसतात. काल (शनिवारी) रात्री दीवार बेटावर पोलिसांनी अशा तळीरामांना चांगलीच अद्दल घडवली आहे.

नागरिकांनी केली होती तक्रार...

माहितीनुसार, दीवार बेटावर मागील अनेक दिवसांपासून अशा घटना घडत होत्या. परिसरात अनोळखी व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली होत असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आल्या होत्या.

तसेच नदीपलीकडील लोकही बेटावर उघड्यावर मद्यपान करण्यासाठी येतात असे सांगण्यात येत होते. यामध्ये प्रामुख्याने परप्रांतीयांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. ते बेटावर येऊन कचरा फेकून, दारूच्या बाटल्या इतरत्र फेकून-फोडून टाकतात, ज्यामुळे स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. दुसरीकडे दीवारमधील काही स्थानिकांचाही अशा कामांमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिकांच्या तक्रारीनंतर जुने गोवा पोलिसांनी दिवारमधील स्थानिकांच्या मदतीने 12 हॉट स्पॉट्स शोधण्यात आले आणि 14 जणांना ताब्यात घेतले. तिथे असलेल्या बंद चर्च परिसरात संशयास्पदरित्या इतर राज्यांतून येणारे लोक पकडले गेले आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासाठी अशा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, त्यांना 27 जूनला दंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GT vs RR IPL 2026 Qualifier 2: गुजरात की राजस्थान? पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कुणाला? पाहा काय सांगतो IPL चा नियम

Monsoon Update: मान्सून उशिरा येणार, पण गोव्यात मान्सूनपूर्व पावसाची बॅटिंग सुरूच राहणार

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! 8व्या वेतन आयोगाला उशीर; होणार लाखोंचे नुकसान, 'हे' आहे कारण

Tata Tiago 2026: 6 एअरबॅग्ज अन् 15 वर्षांची बॅटरी गॅरंटी; टाटाने अवघ्या 5 लाखांत आणली मिडिल क्लाससाठी बेस्ट कार, मिळतील 'हे' दमदार फीचर्स

Goa Politics: निवडणुकीत चुचकारायचे, नंतर विसरायचे! गोव्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेबाबत खेळलं जातंय घाणेरडं राजकारण!

SCROLL FOR NEXT