Old Goa Panchayat Issue order for demolition Dainik Gomantak
गोवा

ओल्ड गोव्यातील वादग्रस्त बंगला पाडण्याचे आदेश

सेव्ह ओल्ड गोवा कृती समितीकडून संबंधित इमारतीच्या बांधकामाविरोधात कोर्टात धाव

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या तीन दिवस आधी ओल्ड गोवा ग्राम पंचायतीने वादग्रस्त बंगला पाडण्याचा आदेश दिला आहे. हा बंगला युनेस्को हेरिटेज झोनमध्ये येत असल्याने पंचायतीने कारवाईचं हत्यार उपसलं आहे. पाडकाम करण्याचा आदेश पंचायतीचे सचिव यांनी जारी केली आहे. या वादग्रस्त बंगल्याचे मालक सुमेरमल जैन यांना 15 दिवसात इमारत पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर या इमारतीचं पाडकाम 15 दिवसात झालं नाही तर ओल्ड गोवा पंचायत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं या आदेशात म्हटलं आहे. अनधिकृत इमारतीच्या पाडकामाचा आदेश 10 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला आहे. (Old Goa Panchayat Issue order for demolition News Updates)

ओल्ड गोवा (Old Goa) परिसरात असलेला हा वादग्रस्त बंगला सुमेरमल जैन, कोरव्हस इन्फ्रा या मुंबईस्थित व्यक्तीची असल्याची माहिती आहे. या कंपनीने एला व्हिलेजमधील सर्व्हे नं 4/1 वर असलेली ही इमारत 15 दिवसात पाडावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करु, असा इशारा ओल्ड गोवा पंचायतीच्या सचिवांनी दिला आहे. कंपनीने संबंधित इमारत न पाडल्यास पंचायत या इमारतीवर कोणतीही सूचना न देता हातोडा चालवेल आणि याचा खर्चही संबंधित इमारत मालकाकडून वसूल करण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सेव्ह ओल्ड गोवा कृती समिती या इमारतीला (BUILDING) फार आधीपासून विरोध करत होती. याप्रकरणी समितीने सुप्रीम कोर्टातही दाद मागितली होती. या इमारतीच्या बांधकामात सरकारी अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोपही होत होता, तसेच याप्रकरणी सखोल चौकशीची मागणीही कृती समितीने केली होती. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Elections) तोंडावर सरकारमधील काही लोकांकडून गोव्याचं हेरिटेज धोक्यात आणलं जात असल्याचा आरोप होताना दिसतोय. याचा फटका सत्ताधारी भाजपला बसण्याची चिन्हं आहे. पणजी आणि ओल्ड गोव्यातील हेरिटेज इमारतींचा मुद्दा अजूनही तापलेलाच असताना या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. ओल्ड गोव्यातील या बंगल्याचं बांधकाम ऑगस्ट 2021 पासून सुरु होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT