Old Goa Panchayat Issue order for demolition Dainik Gomantak
गोवा

ओल्ड गोव्यातील वादग्रस्त बांधकाम प्रकरणाची सुनावणी 15 जूनपर्यंत तहकूब

सुनावणी होईपर्यंत बांधकामाचे काम जैसे थे ठेवण्याचे पंचायत संचालकांचे निर्देश

दैनिक गोमन्तक

पणजी : ओल्ड गोवा येथील जागतिक पुरातन क्षेत्राच्या आवारातील उभारण्यात आलेल्या वादग्रस्त बांधकामाविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरील सुनावणी आज बुधवारी पंचायत संचालकांनी 15 जूनपर्यंत तहकूब केली. सुनावणी होईपर्यंत बांधकामाचे काम जैसे थे ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. (Old Goa Illegal Construction)

ओल्ड गोवा पंचायत क्षेत्रात पुरातन क्षेत्र असलेल्या तसेच सीआरझेड परवाना नसतानाही तेथे नव्याने बांधकाम करून एकमजली बंगल्याचे काम एका भाजपच्या राजकीय व्यक्तीने केले होते. त्याला स्थानिकांनी तसेच पर्यावरणप्रेमींनी विरोध करत तसेच आंदोलन आणि उपोषणे करून त्याची चौकशी करण्यास भाग पाडले होते. जुने गोवे पंचायतीनेही त्याला नव्या बांधकाम परवाना दिला नव्हता. जुने बांधकामाचे नुतनीकरण करण्यात येत असल्याच्या नावाखाली बांधकाम परवान्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र त्या ठिकाणी नवे बांधकाम उभारण्यात येत होते. या प्रकरणी पंचायत खात्यासमोर अनेक तक्रारी विविध पर्यावरणप्रेमी संस्थांकडून दाखल झाल्या आहेत. त्या सर्व पंचायत संचालकांकडे प्रलंबित आहे.

ज्या ठिकाणी वादग्रस्त बांधकाम उभे राहत आहे ते ‘युनेस्को’च्या जागतिक पुरातन क्षेत्राच्या अखत्यारित येत असून तेथे नव्याने बांधकाम करण्यास पूर्ण बंदी आहे. मात्र सर्व नियम धुडकावून आणि परवाने नसतानाही हे बांधकाम सुरू होते. हे प्रकरण राज्यात गाजले तरीही राज्य सरकारने कोणतीच ठोस कारवाई केली नाही. सरकारी प्रक्रियेनुसार त्याची चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगून त्या बांधकामाबाबत अधिक मत व्यक्त करण्यास नकार दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT