Old Dangerous Building Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda: धोकादायक इमारती हटवा! फोंडावासीयांत संताप; पोर्तुगीजकालीन बांधकामाचा समावेश

Ponda Old Buildings: फोंड्यातील तिस्क ते वरचा बाजार बेतोडा - उसगाव तिठ्यापर्यंत अनेक जुन्या आणि जीर्ण इमारती आहेत. त्या इमारती अजूनही तशाच उभ्या आहेत.

Sameer Panditrao

फोंडा: मडगावात गेल्या आठवड्यात दोन जुन्या जीर्ण इमारतींचा काही भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी झाली नाही, तशीच स्थिती फोंड्याची असून फोंडा शहरातही काही जुन्या जीर्ण इमारती आहेत, ज्या कोसळण्याचा धोका असल्याचा दावा करण्यात येत आहे. या इमारती त्वरित हटवाव्यात आणि लोकांच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार दूर करावी, अशी मागणी फोंडावासीयांनी केली आहे.

फोंड्यातील तिस्क ते वरचा बाजार बेतोडा - उसगाव तिठ्यापर्यंत अनेक जुन्या आणि जीर्ण इमारती आहेत. या इमारतींचा धोका ओळखून त्यातील दुकानदार आणि रहिवाशांनी या इमारती सोडल्या आहेत. मात्र, त्या इमारती अजूनही तशाच उभ्या आहेत.

तिस्क - फोंडा येथील पाडण्यात आलेल्या शास्त्री सभागृह इमारतीसमोरील खासगी इमारत, कॅनरा बँकेची शाखा असलेली भली मोठी इमारत, वरचा बाजार भागातील जुन्या दुकानांची इमारत तसेच उसगाव - बेतोडा तिठ्यावरील जुना बाजार विद्यालयाची जीर्ण इमारत सध्या धोकादायक ठरली आहे.

फोंडा शहर हे आकाराने लहान असून दुतर्फा इमारती आहेत. त्यामुळे या जुन्या जीर्ण इमारतींचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतींमधील बहुतांश खासगी इमारती असून लोकांच्या जीविताला धोका असल्याने या इमारती त्वरित पाडण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी होत आहे.

फोंडा पालिकेकडून नोटिसा

फोंडा पालिकेने या धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा पाठवल्या आहेत. या इमारती लोकांसाठी धोका असल्याने संबंधितांनी त्वरित पाडाव्यात आणि हा धोका दूर करावा, असे या नोटिशीत म्हटले आहे.

१५ इमारती धोकादायक

फोंडा शहर तसेच लगतच्या भागातील एकूण पंधरा इमारती धोकादायक स्थितीत आहेत.

यातील काही पोर्तुगीजकालीन इमारती असून बहुतांश इमारती खाली करण्यात आल्या आहेत, तर काही खाली करण्याच्या मार्गावर आहेत.

फोंड्यातील बऱ्याच इमारती या पोर्तुगीजकालीन असून त्यांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची आवश्‍यकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT