Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

ओडीपी बदलाचा कळंगुटला फरक पडत नाही

मायकल लोबो : नागरिकांनी पाच वर्षांपूर्वीच साध्य केले इप्सित

दैनिक गोमन्तक

कळंगुट : सरकारकडून मागच्या पाच वर्षात अधिसुचित करण्यात आलेल्या काही ओडीपीत कळंगुट-कांदोळीसह बदल करण्यात येणार असल्याच्या मंत्री विश्वजीत राणे यांच्या निर्णयाने या भागातील लोकांवर फारसा फरक पडणार नाही, किनारी भागातील लोकांनी आपल्याला जे साध्य करायचे आहे ते मागच्या पाच वर्षात प्राप्त करून घेतलेले आहे, असे मत कळंगुटचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी व्यक्त केले.

काणका येथील स्व. मिल्टन मार्कीस सर्कल ते विश्वाटी विश्वेश्वर मंदिर परिसरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ केल्यानंतर लोबो प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, काणका-वेर्ला पंचायतीच्या सरपंच अमिता कोरगावकर, माजी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष वासुदेव कोरगावकर, उपसरपंच वैशाली आर्लेकर, पंचायत सदस्य निकॉला मार्टीन्स, लक्ष्मीकांत बिचोलकर, श्रीमती मार्कीस आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील पंचायत निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना मायकल लोबो यांनी ओबीसी आरक्षणाची प्रक्रिया हाती घेण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आदेशाचे आपण समर्थन करीत असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तसेच राज्य सरकारने निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार राज्यातील पंचायत निवडणुका घोषीत करण्याआधी सर्वच्या सर्व अर्थातच एकूण 186 पंचायतींतील ओबीसी आरक्षण जाहीर होणे आवश्यक असल्याचे लोबो यांनी सांगितले.

दरम्यान, काणका-म्हापसा येथील नवीन रस्त्याशेजारी स्थानिक शेतकऱ्यांना स्थानिक भाजीपाला तसेच घरगुती खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी त्यांच्या मालकीचे स्टॉल्स उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT