Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दारूच्या नशेत उडाले खटके; रायमध्ये ओडिसाच्या कामगाराची डोक्यात वार करून हत्या

Odisha Worker Murder: शनिवारी रात्री दारूचे पेग रिचविताना खटके उडाल्याने एकाचा खून झाल्याची घटना समोर आलीय.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: शनिवारी रात्री दारूचे पेग रिचविताना खटके उडाल्याने एकाचा खून झाल्याची घटना समोर आलीय. ही खळबळजनक घटना सोनारवाडा, सातेमळ-राय  येथे घडली. खगेश्वर साबर (वय ३८ वर्षे) असे मृताचे नाव आहे.

या प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांनी सशिबांट माझी ऊर्फ लंबू (वय ४२ वर्षे) याला अटक केली आहे, तर अन्य एक संशयित रबी माझी (वय २८ वर्षे) हा सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. संशयित आणि मृत हे दोघेही मूळ ओडिसा राज्यातील आहेत.

एकूण चारजण गोल्डन हाऊस चाळ येथे भाड्याच्या खोलीत ते राहात होते. ते सर्वजण एकाच राज्यातील असले तरी दारूच्या नशेत त्यांच्यात नेहमीच वाद होत असत. या चौघांमधील एकजण शनिवारी टीव्हीवर आयपीएल क्रिकेट मॅच बघण्यासाठी खोलीतून बाहेर पडला होता.

साबर, लंबू आणि माझी हे तिघेजण दारू पीत खोलीत बसले होते. दारूचा अंमल चढल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी रबी याने खगेश्वर याच्या डोक्यावर दंडुक्याने हल्ला केला. हा वार वर्मी लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

संशयित व मृत हे कामगार असून, मिळेल ती लहान-मोठी कामे ते करत होते. त्यांच्यात अधूनमधून खटके उडायचे. शनिवारी आठवड्याचा पगार मिळाल्यानंतर खोलीत दारू आणून ते पार्टी करीत असायचे, अशी माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अन्य लोकांंनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वानऊ ते साडेनऊ यादरम्यान हा खून झाला. रविवारी सकाळी खुनाची माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक सिद्धार्थ शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मायणा कुडतरीचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई तसेच अन्य पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

श्वान पथक व फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. नंतर पोलिसांनी तपास काम सुरू करून लंबू याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली. यावेळी त्याने सर्व घटना पोलिसांनी सांगितली. नंतर त्याला रितसर अटक केली. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई पुढील तपास करीत आहेत.

पगारादिवशी करायचे पार्टी

ज्या दिवशी कामगाराचा खून झाला, त्यादिवशी (शनिवारी) या कामगारांचा आठवड्याचा पगार झाला होता. दरवेळी पगार मिळाल्यानंतर ते खोलीत दारू आणून पार्टी करायचे, असे शेजारी राहणाऱ्या लोकांनी सांगितले.

अन् घटनेला वाचा फुटली

या चाळीच्या मालकीण हेलेना फर्नांडिस या सध्या मुंबईत आहेत. राय येथील चाळीमध्ये अन्य भाडेकरूही राहतात. नेहमीचेच भांडण म्हणून सुरुवातीला येथील लोकांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. पहाटे बंद दाराखालून रक्त वाहत असल्याचे बघून शेजाऱ्यांनी घरमालकिणीला याची माहिती दिल्यानंतर खुनाच्या घटनेला वाचा फुटली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

SCROLL FOR NEXT