75 Creative Minds of Tomorrow Dainik Gomantak
गोवा

75 Creative Minds of Tomorrow: इफ्फीत 48 तासांत चित्रित केली शॉर्ट फिल्म, 'ओड'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

‘मिशन लाइफ’ या विषयावर 48 तासांत लघुपट चित्रित करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते.

Pramod Yadav

75 Creative Minds of Tomorrow: गोव्याच्या घटत चाललेल्या समुद्रकिना-यावर भाष्य करणाऱ्या 'ओड' या लघुपटाला ‘75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव (चित्रपट) आणि NFDC चे व्यवस्थापकीय संचालक NFDC प्रितुल कुमार यांनी विजेत्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत. 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो भारतभरातील तरुण सर्जनशील तरुणांसाठी उत्तम व्यासपीठ असून, चांगल्या आशयासह चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन देतात”, असे कुमार म्हणाले.

‘75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’चे ज्युरी सदस्यांपैकी एक दिग्दर्शक शूजित सिरकार यांनी देखील विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. 'द मिशन लाइफ' या थीमवर 48 तासांत एक लघुपट तयार करणे म्हणजे आत्म-पूर्वनिरीक्षण, आशा, निषेध या सर्व भावना एकत्र करणे, असे सिरकार म्हणाले.

फिल्म चॅलेंजचा एक भाग म्हणून, 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’मध्ये सहभागी स्पर्धकांना पाच संघांमध्ये विभागण्यात आले होते. ‘मिशन लाइफ’ या विषयावर 48 तासांत लघुपट चित्रित करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते.

काय आहे ओड चित्रपटाची कथा?

मच्छीमार मार्सलिन हा त्याची बोट घेऊन पार्किंगची जागा शोधण्यासाठी शहराच्या मध्यभागी जातो. समुद्रकिनारा चोरीला गेला असून, त्याला बोट पार्क करण्यासाठी जागा शिल्लक नाही, अशी तो तक्रार करतो. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने आणि समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाल्यामुळे गोव्याच्या समुद्रकिनाऱ्याऱ्यारी धूप झाली आहे, या समस्येवर हा चित्रपट भाष्य करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thivim Theft: थिवीत वीजतारांवर डल्ला! 83 हजार 437 रुपयांचा मुद्देमाल चोरीला; पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय संशयिताला अटक

Chikhal Kalo Festival: माशेलचा चिखलकाला; सरकारी राज्योत्सव

Velsao railway track: वेळसावात रेलमार्गावरून तणाव, 'जेसीबी'ने खडी हटविण्याचा प्रयत्न; पोलिसांशी वाद

खरी कुजबूज: मुख्यमंत्री पाठीराखे

गृहमंत्री अमित शहा घाबरले, संसदेत येण्याचे धैर्य त्यांच्यात नाही; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची टीका

SCROLL FOR NEXT