MLA Michael and Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: पत्नीच्या नातेवाईकाचा खून आमदार पतीने थेट विधानसभेत मांडली लक्षवेधी

Goa legislative assembly monsoon session 2024: ओर्डा-कांदोळी येथे घरात एकटाच राहणाऱ्या अरनॉल्ड सुवारिस यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली.

Pramod Yadav

गोव्यातील कांदोळी भागात रविवारी अरनॉल्ड सुवारिस या ६९ वर्षीय ओसीआय कार्डधारकाचा धारदार हत्याराने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मृत सुवारिस हे शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांचे नातेवाईक होते.

कांदोळीतील या प्रकरणावरुन आणि राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली.

ओर्डा-कांदोळी येथे घरात एकटाच राहणाऱ्या अरनॉल्ड सुवारिस यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत मायकल लोबो यांनी लक्षवेधी मांडत या घटनेसह आसगाव घर मोडतोड प्रकरणाचा उल्लेख केला. राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत मायकल लोबो यांनी चिंता व्यक्त करत योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली.

लक्षवेधीवर बोलताना दिलायला लोबो यांनी मृत अरनॉल्ड सुवारिस हे त्यांचे नातेवाईक असल्याचे सांगितले. मृत सुवारिस हे त्यांच्या चुलत्याच्या पत्नीचा भाऊ असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात घडणाऱ्या अशाप्रकारच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली.

लोबोंच्या या लक्षवेधीवर आमदार विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा, विरेश बोरकर, वेंझी व्हिएगस, निलेश काब्राल, रुडॉल्फ फर्नांडिस, उल्हास तुयेकर, चंद्रकांत शेट्ये, जेनेफर मोन्सेरात, आंतोनियो वाझ आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मत मांडत सूचना केल्या.

आमदारांनी सूचना करताना राज्यात सीसीटीव्ही कॅमेरे, भाडेकरु पडताळणी, रात्रीची पोलिस गस्त आणि सार्वजनिक ठिकांच्या सीसीटीव्हीचा एक्सेस थेट पोलिस ठाण्यात देण्यात यावा अशी मागणी केली.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात भाडेकरुंची पोलिस पडताळणी बंधनकारक असल्याचे नमूद केले. घरमालकांनी देखील याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

तसेच, Visitor Connect नावाचे Mobile App पोलिसांच्या मदतीसाठी सुरु केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT