Alex Sequeira Dainik Gomantak
गोवा

Panaji News : कायद्याच्या विद्यार्थ्यांवर भारतीय राज्यघटनेच्या संरक्षणाचे दायित्व : आलेक्स सिक्वेरा

Panaji News : पणजीत ‘टेली लॉ’ या पुस्तकाचे प्रकाशन; सरकारी सेवा आणि कायदेशीर​ मदत देशातील दुर्गम भागात पोहोचण्याची गरज असल्याचेही मंत्र्यांनी नमूद केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, कायदा विषयात प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय राज्यघटनेचे रक्षण व संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन कायदा व न्यायव्यवस्था मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केले.

सरकारी सेवा आणि कायदेशीर​ मदत देशातील दुर्गम भागात पोहोचण्याची गरज असल्याचेही मंत्र्यांनी नमूद केले.

सिक्वेरा हे बुधवारी (ता.२१) सकाळी कला आणि संस्कृती संचालनालय पणजी येथे न्याय विभाग, कायदा व न्याय मंत्रालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘हमारा संविधान हमारा सन्मान’ मोहिमेच्या ‘टेली लॉ’ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कला आणि संस्कृती संचालनालय पणजी येथे आयोजित ‘टेली लॉ’ कार्यक्रमादरम्यान मंत्री ॲलेक्स सिक्वेरा म्हणाले की, ‘टेली लॉ’ कार्यक्रम सुरू झाल्यापासून गेली ७ वर्षे आम्ही भारतातील नागरिकांना न्याय दिला आहे.

याचा परिणाम असा आहे की, ७० लाखांहून अधिक लोकांना ‘टेली लॉ’ कार्यक्रमाचा फायदा झाला. या लोकांना कायदेशीर मदत आणि आधार मिळाला आहे. यामुळे या ‘टेली लॉ’ कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. कार्यक्रमादरम्यान ‘टेली लॉ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास इतर मान्यवर उपस्थित होते.

लोकांपर्यंत पोहोचावे

तरुणांना संदेश देताना मंत्री म्हणाले की, मी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांना सांगू इच्छितो की, या देशाच्या संविधानाचे रक्षण आणि जतन करणे ही त्यांची जबाबदारी आहे.

तरुणांनी या देशातील दुर्गम भागात ‘टेली लॉ’ कार्यक्रमासह पोहोचले पाहिजे. जेणेकरून अधिकाधिक गरजू लोकांना त्यांच्या दारी सरकारी सेवा मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT