Large Number of Shivpremis Gathered at Vasco Police Sation  Dainik Gomantak
गोवा

शिवरायांविरोधी वक्तव्य! फादर विरोधात गुन्हा दाखल करून अटकेची मागणी, वास्कोत तणाव

मोठ्या प्रमाणावर हिंदू संघटना आणि शिवप्रेमी वास्को पोलीस ठाण्याच्या बाहेर गोळा झाले असून, तेथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

Pramod Yadav

Large Number of Shivpremis Gathered at Vasco Police Sation: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याप्रकरणी, ख्रिश्चन धर्मगुरू फादर बोलमेक्स परेरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी. अशी करत मागणी करत शिवप्रेमी आणि हिंदू संघटनांनी वास्को पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली आहे.

मोठ्या प्रमाणावर हिंदू संघटना आणि शिवप्रेमी वास्को पोलीस ठाण्याच्या बाहेर गोळा झाले असून, तेथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

प्रकरण नक्की काय?

चिखली वास्को येथील फादर बोलमॅक्स परेरा यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज हिरो पण देव नाही' असे वक्तव्य केले. याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला.

"शिवाजी राष्ट्रीय हिरो आपण त्यांना मान दिला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे. या राज्यासाठी त्यांनी केलं त्याचा आपण आदर केला पाहिजे. ते हिरो आहेत पण देव नाहीत. पण हिंदू लोकांनी त्यांना देव केलं आहे.' असे वक्तव्य फादर बोलमॅक्स परेरा यांनी केले आहे.

याप्रकरणी काणकोण पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल झाली. दरम्यान, शिवप्रेमी आणि हिंदू संघटनांनी आता फादर विरोधात गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करत वास्को पोलीस स्टेशन बाहेर गर्दी निदर्शने सुरू केली आहेत.

विधानसभेत देखील मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला होता मुद्दा

'मणिपूर हिंसाचाराचा विषय संवेदनशील आहे. तेथील राज्य सरकार त्यावर कारवाई करत आहेच, शिवाय देशाच्या गृहमंत्रालयाने याची दखल घेतली आहे. त्यामुळे मणिपूर हिंसाचारावरील चर्चेचा ठराव फेटाळत आहोत.' असे सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले. यावरून विरोधी पक्षातील आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मणिपूरचा विषय संवेदनशील असल्याचे सांगत, फादर बोलमॅक्स परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा विषय काढला. फादरने माफी मागितली पण, समाजिक तिढा निर्माण करणारे विषयांना हात घालायला नको असे मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात स्पष्ट केले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT