Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

ओबीसी आरक्षण प्रक्रिया तिहेरी चाचणीविना

सुनावणी आजही पुढे सुरु राहणार; याचिकादारांच्या वकिलांचा गोवा खंडपीठात युक्तिवाद

दैनिक गोमन्तक

पणजी : पंचायत निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार तिहेरी चाचणीची योग्य प्रक्रिया करून करण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 13 जुलै रोजी जारी केलेली अधिसूचना रद्द करावी असा युक्तिवाद काल बुधवारी याचिकादारांच्या वकिलांनी गोवा खंडपीठात केला. ही सुनावणी अपूर्ण राहिल्याने ती आज गुरुवारी (21 जुलै) सुरू राहणार आहे.

नागोआ-हडफडे, पर्रा, कांदोळी, मांद्रे व साळगाव पंचातीच्या काही प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या याचिका सादर केल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणबाबत जाही केलेली अधिसूचना योग्य प्रक्रिया अवलंबून केली नसल्याने ती रद्द करण्यात यावी किंवा त्याला स्थगिती द्यावी असा युक्तिवाद ॲड. सरेश लोटलीकर यांनी काल बुधवारी केला.

1 जुलै 2022 रोजी निवडणूक आयोगाने अधिसूचना काढताना ओबीसी आरक्षण देणे शक्य नसल्याने त्यात आरक्षणाचा उल्लेख केला नव्हता. अनुसूचित जाती व जमाती तसेच महिलांना आरक्षण त्यात दाखवण्यात आले होते अशी बाजू मांडली.

सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला ओबीसी आरक्षणाच्या सर्वेसाठी स्थापन केलेल्या समितीची माहिती देण्याचे सांगितले. तसेच या समितीने हे आरक्षण कोणत्या निकषावर ठरविले आहे, त्याचा तपशील आज सुनावणीवेळी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT